'बीएसएनएल' चे वाय-फाय हॉटस्पॉटसाठी चार प्लान्स, १९ रुपयांत ग्राहकांना मिळेल २ जीबी डेटा


वृत्तसंस्था /  नवी दिल्ली  :  भारत संचार निगम लिमिटेड (BSNL)  वाय-फाय हॉटस्पॉट वाढवण्यासाठी प्रयत्नशील असून  बीएसएनएलने नवीन ४ प्लान्स आणले आहेत. हे प्लान्स १०० रुपयांहून कमी किंमतीतील आहेत. 
'बीएसएनएल'ने वाय-फाय हॉटस्पॉटसाठी १९ रुपये, ३९ रुपये, ५९ रुपये आणि ६९ रुपये हे चार प्लान्स बाजारात उतरवण्याचा निर्णय घेतला आहे. १९ रुपयांच्या व्हाउचरमध्ये ग्राहकांना २ दिवसांच्या वैधतेसह २ जीबी डेटा मिळेल. ३९ रुपयांच्या प्लान्समध्ये ७ दिवसांच्या वैधतेसह ७ जीबी डेटा मिळेल. ५९ रुपयांच्या प्लानमध्ये १५ दिवसांच्या वैधतेसह १५ जीबी डेटा मिळेल तर ६९ रुपयांच्या प्लानमध्ये २८ दिवसांसाठी ३० जीबी डेटा ग्राहकांना मिळेल. 
बीएसएनएलच्या वेबसाइटवर हॉटस्पॉट लोकेटरचाही एक पर्याय देण्यात आला आहे. बीएसएनएलचे ग्राहक आपल्या जवळील वाय-फाय हॉटस्पॉटची माहिती यावरून घेऊ शकतात. यासाठी ग्राहकांना आपले शहर आणि सर्कलची माहिती भरावी लागेल. कंपनीने देशभरात १६ हजार ३६७ लोकेशनवर एकूण ३० हजार ४१९ हॉटस्पॉट इंस्टॉल केले आहेत. हॉटस्पॉट वापरण्यासाठी सर्वात आधी वाय-फाय सुरू करावे लागेल. त्यानंतर ४ जी प्लस एसएसायडीची निवड करावी लागेल. बीएसएनएलचे सीम कार्ड स्लॉट केल्यानंतर ग्राहक इंटरनेटचा वापर करू शकतात.   Print


News - World | Posted : 2019-03-29


Related Photos