महत्वाच्या बातम्या

 संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळाच्या विविध योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / नागपूर : संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळामार्फत चर्मकार समाजातील व्यक्तींसाठी विविध योजना महामंडळामार्फत दरवर्षीप्रमाणे यंदाही राबविण्यात येत आहेत. सन २०२३-२४ हे महामंडळाचे सुवर्ण महोत्सवी वर्ष असून या महामंडळामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन महामंडळमार्फत करण्यात आले आहे.

महामंडळाची स्थापना १ मे १९७४ रोजी करण्यात आली आहे. अनुसूचित जातीतील चर्मकार समाजाच्या आर्थिक, शैक्षणिक व सामाजिक विकासासाठी विविध कर्ज योजना राबविल्या जातात. महामंडळामार्फत सन २०२३-२४ या आर्थिक वर्षाकरिता राज्य शासनाच्या व केंद्र शासनाच्या (एनएसएफडीसी) योजना राबविण्यात येत आहेत. ४ हजार ८०० लाभार्थ्यांना कर्ज वाटपाचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी महामंडळाच्या नजीकच्या जिल्हा कार्यालयास भेट देत योजनांची माहिती जाणून घेण्याचे आवाहन महामंडळातर्फे करण्यात आले आहे. 





  Print






News - Nagpur




Related Photos