महत्वाच्या बातम्या

 पो.स्टे. पोंभुर्णा अंतर्गत मौजा सोनापुर येथे चुलत मुलाकडुन मोठया आईची दगडाने ठेचून हत्या


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / चंद्रपूर : पोलीस स्टेशन पोंभुर्णा अंर्तगत मौजा सोनापुर येथील २७ वर्षीय विवाहित महिलेने तक्रार नोंदविली की. १० जुलै २०२३ रोजी ११:०० वाजता सुमारास आपल्या शेतात निंदनी करण्यासाठी गावातील इतर दोन महिलासोबत जावुन दुपारी २:३० वा. सुमारास घरी परत येत असतांना तिचा चुलत दिर धिरज ठेंगणे यांच्या घराजवळ आली. तेव्हा धिरज ठेंगणे तिचा हात पकडुन तिला जबरदस्तीने आपले गोठयाकडे नेवुन तिला २० हजार रू. दे नाहीतर तुझा रेप करतो. म्हणुन तिचेशी जबरदस्ती करु लागल्याने फिर्यादीने घाबरुन तिला पैसे देण्याचे कबुल केले. तेंव्हा आरोपीने तिला जर तु पैसे आणुन दिले नाही. तर तुला व तुझ्या पोराला मारून टाकतो. म्हणुन फिर्यादीचा मोबाईल आपले जवळ ठेवला. तेंव्हा फिर्यादीने कशीबशी आपली सुटका करून घरी आली व घरी हजर असलेली तिची सासु पुष्पा मधुकर ठेंगणे हिला धिरज रविद्र ठेंगणे याने तिच्या सोबत केलेल्या वरील घटनेबाबत सांगितले. असता सासु पुष्पा ठेंगणे हिने मी आता त्याच्याकडे जातो व त्यास जाब विचारून तुझा मोबाईल त्याच्याकडुन मागुन आणतो. म्हणुन गेली परंतु बराच वेळापर्यंत घरी परत न आल्याने फिर्यादीने तिच्या पतीला दुसऱ्याचे मोबाईलने फोन करुन घरी बोलावुन सर्व हकिकत सांगितल्याने तिचा पती हा धिरज ठेंगणे याच्या घराजवळ जावुन थोडयात वेळाने परत येवुन सांगितले की, आईचा धिऱ्याने मर्डर केला, आईला खाताचे खडयात टाकुन आहे. असे सांगितले वरुन फिर्यादी पुन्हा पती सोबत सदर ठिकाणी जावुन पाहिले असता सासु पुष्पा मधुकर ठेंगणे ही खाताचे खडयातील जमा असलेल्या पाण्यात मृतावस्थेत मिळुन आली. फिर्यादींचा चुलत दिर धिरज रविंद्र ठेंगणे (२०) याने फिर्यादीची सासु पुष्पा मधुकर ठेंगणे हिला कोणत्यातरी दगडाने कपाळावर, नाका-तोंडावर मारुन तिचा खुन केला. 

अशा फिर्यादीचे रिपोर्ट वरुन पोलीस स्टेशन पोंभुर्णा येथे आरोपीविरुध्द कलम ३०२, ३५४, ३५४(ब), ३२९, २०१, ५०६ भादंवि अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला असुन आरोपी घटनेनंतर जंगलात फरार झाल्याने पो.स्टे. पोंभुर्णा येथील ठाणेदार सपोनि मनोज गदादे व स्टॉफ, उपपोस्टे उमरी पोतदार येथील ठाणेदार सपोनि किशोर शेरकी व स्टॉफ तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि महेश कोंडवार व स्टॉफ यांनी आरोपीचा कसोशीने शोध घेवून त्यास ताब्यात घेतले आहे.

गुन्हयाचे घटनास्थळ अपर पोलीस अधीक्षक रिना जनबंधु तसेच मल्लीका अर्जुन इंगळे, उपविभागीय पोलीस अधिकारी मूल यांनी भेट दिली असुन त्यांच्या आणि पोलीस अधीक्षक रविंद्रसिंह परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हयाचा पुढील तपास सुरु आहे.





  Print






News - Chandrapur




Related Photos