छत्तीसगडमध्ये सुरक्षा दलाकडून चार नक्षल्यांचा खात्मा


विदर्भ न्यूज  एक्सप्रेस 
वृत्तसंस्था /रायपूर :
सुकमामधील बिमापूरममध्ये सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये आज २६  मार्च रोजी झालेल्या चकमकीत चार नक्षल्यांचा खात्मा करण्यात सुरक्षा दलाला यश आले आहे. तसेच घटनास्थळावरून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त केला आहे. 
प्राप्त माहितीनुसार, छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यातील जागरगुंडा येथे नक्षलवादी आणि कमांडो बटालियन दरम्यान चकमक झाली. या चकमकीत चार नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले आहे. बिमापूरमपासून १ किलोमीटर अंतरावर ही चकमक झाली. कोबरा २०१ बटालियनचे कमांडो सर्च ऑपरेशन करत असताना काही नक्षलवाद्यांनी कमांडोंच्या दिशेने गोळीबार सुरू केला. त्याला प्रत्युत्तर म्हणून या जवानांनीही गोळीबार केला व या गोळीबारात ४ नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आले. या चारही नक्षलवाद्यांचे मृतदेह जवानांनी ताब्यात घेतले आहेत. नक्षलवाद्यांकडून १ रायफल आणि दोन थ्री नॉट थ्री रायफल ताब्यात घेण्यात आल्या आहेत. गोळीबार थांबल्यानंतरही जवानांनी या ठिकाणी सर्च ऑपरेशन सुरू ठेवलं आहे.   Print


News - World | Posted : 2019-03-26


Related Photos