महत्वाच्या बातम्या

 लग्नाचे वचन मोडल्यास सहमतीने ठेवलेले शरीरसबंध बलात्कार होत नाही : उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय 


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

वृत्तसंस्था / ओडिसा : लग्नाचे वाचन देऊन हमतीने ठेवलेले शरीरसबंध, हे वचन पूर्ण न केल्यास बलात्कार मानला जाऊ शकत नाहीत, असा मोठा निर्णय ओडिसा उच्च न्यायालयाने दिला आहे. भुवनेश्वर येथील एका तरुणावर लावण्यात आलेल्या बलात्काराचा आरोप रद्द करण्याचे निर्देशही उच्च नायल्याने दिला आहे. न्यायमूर्ती आर. के. पटनायक यांनी याबाबतचा निर्णय दिला असून बलात्काराचा आरोप रद्द झाला असला तरी तरुणीवर फसवणुकीच्या आरोपांची चौकशी सुरूच राहणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. 

याचिकाकर्त्यांची मैत्रीण असलेल्या एका महिलेने तरुणावर लग्नाचे वचन देऊन बलात्कार केल्याचा आरोप केला आहे. या महिलेने तिचा पतीसोबत वैवाहिक वाद सुरु असून सदर तरुणाने आपल्याला लग्नाचे वचन देऊन बलात्कार केल्याचा आरोप तिने केला होता. याप्रकरणी ओडिसा उच्च न्यायालयात न्यायमूर्ती आर. के. पटनायक यांच्यासमोर सुनावणी पार पडली आहे. 

लग्नाचे वचन हे एका विश्वासाने दिले जाते. वचन देऊन काही कारणास्तव ते पूर्ण करू न शकने आणि सुरुवातीपासून लग्नाचे खोटे अमिश देणे या दोन्ही गोष्टींमध्ये छोटासा फरक आहे. जर सुरुवातीलाच लग्नाचे खोटे वचन दिले असेल तर त्याप्रकरणी कलम ३७६ अंतर्गत बलात्काराचा गुन्हा दाखल केला जाऊ शकतो. मात्र या प्रकरणात असे झाले नाही. असे निरीक्षक न्यायमूर्ती पटनायक यांनी नोंदविले आहे. 

या सुनावणीवेळी ओडिसा उच्च नायल्याने सर्वोच्य नायल्याच्या एका निर्णयाचाही दाखल दिला आहे. सर्वोच्य न्यायालयाने आपल्या एका आदेशात म्हंटले आहे कि, जर एखाद्या व्यक्तीने पीडितेला लग्नाचे वाचन देऊन तिच्यासोबत शरीरसंबंध ठेवले, आणि काही कारणास्तव नंतर हे वचन पूर्ण होऊ शकले नाही तर त्याला बलात्कार म्हणता येणार नाही. 





  Print






News - World




Related Photos