महत्वाच्या बातम्या

 बल्लारपूर वेकोलि आंतर विभागीय बॅडमिंटन स्पर्धेत बल्लारपूर उपविभाग संघाचा विजय


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / बल्लारपूर : सास्ती धोपटाळा येथील मनोरंजन केंद्र मध्ये पवनी उपविभाग च्या वतीने आयोजित तीन दिवसीय बॅडमिंटन स्पर्धेत एकूण सहा संघांनी सहभाग घेऊन चमकदार कामगिरी करत मुख्य सामन्यात बल्लारपूर उपविभाग संघाने सास्ती उपविभाग संघाचा पराभव करून विजेतेपद पटकावले. उद्घाटन व्यवस्थापक जी. प्रसाद यांनी केले. स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी पवनी उपविभाग चे कार्मिक व्यवस्थापक रामकृष्ण रेड्डी, क्रीडा समितीचे सदस्य गणेश पिसे प्रयत्नशील होते. बक्षीस वितरण समारंभास प्रादेशिक कार्मिक व्यवस्थापक सी.व्ही.एस.रामानुजम व जॉन प्रामुख्याने उपस्थित होते. 

तथा पाच कामगार संघटनांचे पदाधिकारी विशेष उपस्थिती होते. बल्लारपूर उपविभागातील रमेश रमिल्ला, सुजित निर्मल, येल्या दसरप, सुरेश केवट, आशिष उमक, दीप चौधरी आदींचा विजयी खेळाडूंमध्ये समावेश आहे.





  Print






News - Chandrapur




Related Photos