संजय दत्त उत्तर प्रदेशातील गाझियाबाद येथून निवडणूक लढविणार


वृत्तसंस्था / मुंबई :  अभिनेता संजय दत्त   उत्तर प्रदेशातील गाझियाबाद येथून समाजवादी पक्षाच्या तिकीटावर निवडणूक लढविण्याची शक्यता आहे. संजय दत्तचे वडील सुनील दत्त काँग्रेस खासदार होते. तर बहिण प्रिया दत्तदेखील काँग्रेसकडून खासदार झाल्या आहेत.
२००९ मध्ये  राज्यसभा खासदार अमर सिंह यांच्या आग्रहाखातर संजय दत्तने ‘सपा’ मध्ये प्रवेश केला होता. त्यावेळी संजय दत्तने लखनौ येथून निवडणूक लढविण्याची घोषणा देखील केली होती. परंतु काही कारणास्तव तो निवडणूक लढवू शकला नाही. नंतर अमरसिंह यांनी समाजवादी पक्षाला रामराम केल्यानंतर संजय दत्तनेही पक्षाशी फारकत घेतली.
आता पुन्हा एकदा संजय दत्त लोकसभा निवडणूक लढवणार असल्याची जोरदार चर्चा आहे. सपा संजयला गाझियाबादमधून उमेदवारी देण्याची शक्यता आहे. समाजवादी पक्ष गाझियाबादमध्ये केंद्रीय मंत्री व्ही.के. सिंह यांना टक्कर देण्यासाठी योग्य उमेदवाराच्या शोधात आहे. यासाठी शत्रुघ्न सिन्हा आणि संजय दत्त यांची नावं चर्चेत आहेत.    Print


News - Rajy | Posted : 2019-03-18


Related Photos