महत्वाच्या बातम्या

 घुग्घुस येथे शाळा प्रवेशोत्सव उत्साहात साजरा


विदर्भ न्युज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / चंद्रपूर :  ३० जून ला श्री.साईबाबा ग्रामीण विकास संस्था, गडचिरोली द्वारा संचालित प्रियदर्शिनी कन्या विद्यालय शाळा मध्ये प्रवेशोत्सव दिन संपन्न झाला.

यावेळी नवागत विद्यार्थ्याचे ढोल, ताशांच्या गजरात पुष्पगुच्छ देवुन,  मिठाई चारुन स्वागत करण्यात आले. वर्ग ५ वी ते ८ वी विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तक, नोटबुक व लेखन साहित्य वितरीत करण्यात आले.

यावेळी आयोजित कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्राचार्य अनू खानझोडे,  प्रमुख पाहुणे पर्यवेक्षक फाल्गुन खामणकर, प्रा. संजय बाबरे, प्रा. वैशाली जोशी, विनायक टोंगे सह पालक वर्गातील विद्यार्थ्यांनीची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

कार्यक्रमाचे संचालन बलवंत विखार यांनी तर प्रा. प्रकाश सातार्डे यांनी आभार मानले.





  Print






News - Chandrapur




Related Photos