गडचिरोली जिल्ह्यात बीएसएनएलची ब्रॉडबँड इंटरनेट सेवा विस्कळीत


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली :
शहरातील काही भागासह जिल्ह्यातही अनेक ठिकाणी बीएसएनएलची ब्रॉडबँड इंटरनेट सेवा विस्कळीत झाली आहे. त्यामुळे डिजिटल इंडियाचे स्वप्न पूर्ण होण्यास बीएसएनएल अडचण निर्माण करीत आहे. मात्र संबंधित विभागाचे याकडे पूर्णतः दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे . 
जिल्ह्यातील सुगम व दुर्गम क्षेत्रात बीएसएनएल ब्रॉडबँड इंटरनेट सेवा पुरवत असून अनेक शासकीय कार्यालये , अधिकोष , खाजगी कार्यालये या सेवेवर विसंबून असतात , मात्र गेल्या महिन्यापासून बीएसएनएल ची सेवा विस्कळीत झाल्यामुळे अनेकांना याचा फटका बसत आहे .जिल्हा व  तालुका  मुख्यालयातील कार्यालयात किंवा खाजगी कामाकरिता नागरिकांना कोसो दूरवरून यावे लागते. आणि बीएसएनएलमुळे आल्या पावली काम अर्धवट सोडून माघारी लोटावे लागत आहे . याच कारण काय तर डिजिटल इंडियाचा स्वप्न पूर्ण करण्यास हातभार लावणारी सेवा म्हणजेच बीएसएनएल. 
शहरातील व ग्रामीण भागातील बीएसएनएल वर चालणारी अनेक कामे ठप्प पडलेली आहेत . नक्षलग्रस्त भागातील पोलीस ठाण्यात संपर्क करण्यास अधिकाऱ्यांना व सर्वसामान्यांना अडचण निर्माण होत आहे. संपर्काअभावी अनुचित घटना देखील नाकारता येत नाही. मात्र संबंधित विभाग अजूनही गाढ ज़ोपेतच आहे . बीएसएनएलच्या या बोगस सेवेमुळे सर्वसामान्यांतून रोष व्यक्त केल्या जात आहे .   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-03-14


Related Photos