स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गायत्री शक्तीपिठ मंदिरातील चोरी २४ तासात केली उघड : मुद्देमालासह तीन आरोपी गजाआड


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर :
स्थानिक रामनगर पोलिस स्टेशन येथे १२ मार्च रोजी ऐतिहासिक शक्तीपिठ मंदिरात चोरी झाल्याची तक्रार दाखल होताच स्थानिक गुन्हें शाखेच्या पथकाने गुन्हा तपासात घेऊन संशयितांना ताब्यात घेतले, त्यांना विचारपूस केली असता त्यांनीच हि चोरी केल्याचे उघड झाले . याप्रकरणी मुद्देमालासह तीन आरोपीना २४ तासात अटक करण्यात आली. वैभव दिलीप जातेगावकर रा. समाधी वार्ड , आकाश केशव दखणे रा. गोपालपुरी, हनुमान मंदिर चंद्रपुर असे आरोपींचे नाव असून आणखी एका आरोपीला अटक करण्यात आली आहे . 
 १२ मार्च रोजी पोलिस स्टेशन रामनगर येथे अपराध क. २९१/२०१९ कलम ४५७,३८०  भादवि चा गुन्हा नोंद करण्यात आला. गुन्हा नोंद होताच गुन्हयाचे गांभीर्य लक्षात घेवुन सदर गुन्हा उघडकीस आणण्याचे दृष्टीने स्थानिक गुन्हें शाखेच्या पथकाने माहिती काढण्यास सुरूवात केली. काही तासात स्थानिक गुन्हे शाखेस मिळालेल्या गोपनीय माहितीवरून समाधी वार्ड चंद्रपुर येथे राहणारा आरोपी वैभव दिलीप जातेगावकर यास ताब्यास घेवुन सखोल विचारपुस केली असता, त्याने मंदिरातील चोरी ही तो आणि त्याचे साथीदार यांनी मिळवुन केल्याची कबुली दिल्याने आरोपी नामे  आकाश केशव दखणे रा गोपालपुरी  हनुमान मंदिर चंद्रपुर + १ यांना अटक करण्यात आली आहे. आरोपीकडुन मंदिरातील मुर्तीचे डोंक्यावरील चांदिचे झुंबर, दानपेठीतील नगदी २३८० रू. व गुन्हयात वापरलेली हिरो होन्डा स्प्लेंडर क्र. एमएच- ३४ एएच-७७८९  असा मुद्देमाल २४  तासात ताब्यात घेण्यात आला आहे. सदर गुन्हयातीन तीन्ही आरोपीना अटक करण्यात आली असुन गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस स्टेशन रामनगर हे करीत आहे. 
सदरची  कार्यवाही पोलीस अधिक्षक चंद्रपुर, डाॅ. महेश्वर रेड्डी यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक  ओमप्रकाश कोकाटे, स्था. गु. शा. चंद्रपुर यांचे नेतृत्वात सफौ पंडीत वरहाटे, नापोशि चंदु नागरे, नापोशि अविनाश दशमवार, नापोशि जमिल खान पठान यांनी पार पाडली.  Print


News - Chandrapur | Posted : 2019-03-14


Related Photos