पुसेर येथे नक्षलवाद्यांनी चार ट्रॅक्टर जाळले


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली :
  निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर दहशत माजवण्याचा प्रयत्न केला असून  एटापल्ली तालुक्यातील पुसेर येथे नक्षलवाद्यांनी चार ट्रॅक्टर जाळले.  
नक्षलवाद्यांनी काल मध्यरात्रीच्या सुमारास एटापल्ली तालुक्यातील पुसेर  येथील रस्त्याच्या कामासाठी आणण्यात आलेले चार ट्रॅक्टर पेटवून दिले. यात सुमारे ५० लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.  याआधी नक्षलवाद्यांनी जानेवारी महिन्याच्या अखेरीस  जिल्ह्यातील कुरखेडा, कोरची या गावात विकासकामांवरील  अनेक वाहने पेटवून दिली होती.   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-03-13


Related Photos