डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय कन्व्हेंशन सेंटरमध्ये अभ्यासिका सुरु
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / नागपूर : आपल्या जीवनात यशस्वी होऊ इच्छिणाऱ्या अभ्यासू युवा वर्गाला शैक्षणिक प्रवाहात आणण्याच्या उद्देशाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय कन्व्हेंशन सेंटर, कामठी रोड, इंदोरा नागपूर येथिल ग्रंथालय स्पर्धा परीक्षांच्या यूपीएससी, एमपीएससी आदी अभ्यास करणाऱ्या सर्वसामान्य विद्यार्थ्यांसाठी खुले करण्यात येत आहे. त्यासाठी इच्छुक विद्यार्थ्यांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.
यासाठी हस्तलिखित अर्जावर छायाचित्र, नाव, कायम व पत्रव्यवहाराचा पूर्ण पत्ता, मोबाईल क्रमांक, पालकांचा मोबाइल क्रमांक, ई-मेल आयडी, आधार कार्डची छायाप्रत, पूर्ण केलेले शिक्षण, मार्कशीट, डिग्री प्रमाणपत्र छायाप्रत, तयारी करीत असलेल्या स्पर्धा परीक्षेचे नाव, यापूर्वी उत्तीर्ण झालेल्या परीक्षांचे नाव इत्यादी संपूर्ण बायोडाटासह नमूद करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय कन्व्हेंशन सेंटर, कामठी रोड, इंदोरा नागपूर येथे समीर ढोणे, सुपरवाईजर यांचेकडे प्रवेश अर्ज सादर करावेत, असे आवाहन समाज कल्याण विभागाचे प्रादेशिक उपायुक्त डॉ. सिद्धार्थ गायकवाड यांनी केले आहे.
News - Nagpur