क्रिकेट सामन्यावर सट्टा चालविणाऱ्यावर पोलिसांची कारवाई : ८१ हजारांच्या मुद्देमालासह एकाला अटक


- स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई 
विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / भंडारा : 
भारत-आस्ट्रेलीया क्रिकेट सामन्यावर सट्टा सुरू असल्याच्या गोपनीय माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गणेशपूर येथील नेहरु वॉर्डात धाड टाकून  एका इसमाला अटक केली व त्याच्याकडून ८१ हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. अमीत मनोहर उदापुरे असे आरोपीचे नाव आहे . 
क्रिकेट सामन्यावर सट्टा, बेटींग करीत असल्याची माहिती मिळाली. यावर जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद साळवे यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र मानकर यांना कारवाई करण्याचे निर्देश दिले. मानकर यांनी सापळा रचून गणेशपूर येथे धाड घातली. यात अमीत उदापुरे याला मुद्देमालासह अटक केली. त्याच्या ताब्यातून ५ मोबाईल, १५ हजार रुपयांची रोख, हिशोब ठेवण्याचे रजिस्टर, एलईडी टिव्ही, सेटटॉप बॉक्स असा एकुण ८१ हजार ५६० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपी विरुद्ध भंडारा पोलीस ठाण्यात महाराष्ट्र जुगार कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
सदर कारवाई पोलीस निरीक्षक रवींद्र महाजन, पोलीस निरीक्षक सचिन गदादे, सहाय्यक फौजदार अश्विनकुमार मेहर, हवालदार तुलशीदास मोहरकर, पोलीस नायक विजय तायडे, निरंजन कढव, किशोर मेश्राम, शिपाई शैलेश बेदुरकर, पंकज भित्रे, अर्चना कुथे, सुप्रिया मेश्राम यांनी केली .   Print


News - Bhandara | Posted : 2019-03-10


Related Photos