लाखनी येथील दुय्यम निबंधक कार्यालयातील कनिष्ठ लिपीक, ऑपरेटर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / भंडारा :
घर खरेदी प्रकरणी नोटरीवरून रजिस्टी करण्याच्या कामासाठी पाच हजारांची लाच स्वीकारल्याप्रकरणी लाखनी येथील दुय्यम निबंधक कार्यालयातील कनिष्ठ लिपीक व ऑपरेटर  लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकला आहे. दिनेश विष्णुजी कुंभलकर (५४) असे लाचखोर कनिष्ठ लिपीकाचे नाव असून सध्या प्रभारी दुय्यम निबंधक म्हणून कार्यरत होता. तर समिर शेख (३०) असे ऑपरेटर चे नाव आहे. शेख हा रोजंदारीवर कार्यरत आहे.
तक्रारदाराने लाखणी येथे पुर्ण बांधकाम असलेले घर १९ लाखात डिसेंबर मध्ये नोटरी करून २६ फेब्रुवारी रोजी नोटरीवरून दुय्यम निबंधक कार्यालयात रजिस्ट्री केली. रजिस्ट्री करीता प्रभारी दुय्यम निबंधक कुंभलकर व ऑपरेटर शेख यांचे मिळून १६ हजार रूपये शेखकडे दिले. यानंतर समिर शेख याने २२ हजार रूपये लाचेची मागणी करून उर्वरीत ६ हजार रूपये २७  फेब्रुवारी रोजी आणून देण्यास सांगितले. वाढीव ६ हजारांची मागणी करून तडजोडीअंती समिर शेख याच्या मार्फतीने ५ हजारांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली.
याप्रकरणी लाखनी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर कारवाई पोलिस उपायुक्त, पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलिस अधीक्षक राजेश दुद्दलवार यांच्या मार्गदर्शनात पोलिस उपअधीक्षक महेश चाटे, पोलिस निरीक्षक योगेश्वर पारधी, पोलिस निरीक्षक प्रतापराव भोसले, पोलिस नाईक अश्विनकुमार गोस्वामी, सचिन हलमारे, शेखर देशकर, पराग राउत, कोमलचंद बनकर, चालक शिपाई दिनेश धार्मिक यांनी केली आहे.

   Print


News - Bhandara | Posted : 2019-02-28


Related Photos