महत्वाच्या बातम्या

 वाघाच्या हल्यात युवकाचा मृत्यू : सिंदेवाही तालुक्यातील घटना


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / सिंदेवाही : सिंदेवाही तालुक्यातील चिटकी (मुरपार) या जंगलात नवेगाव (लोनखैरी) येथील रघुनाथ नारायण गुरनुले वय 34 हा युवक जंगलात बांबू आणासाठी गेला होता. पण या घनदाट जंगलात झुडपामधुन वाघाने हल्ला करीत बेसावध असलेल्या रघुनाथ गुरनुले या तरुणाला जागीच ठार केले.

रघुनाथ नारायण गुरनुले 34, रा. नवेगाव असे मृत युवकाचे नाव आहे. हा युवक दुपारी 3 वाजताच्या सुमारास एफडीसीएम या हद्दीत बांबू तोडण्याकरिता गेला होता, त्याच दरम्यान लपून असलेल्या वाघाने झडप घालून मान पकडून ठेवल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. ही घटना 15 जून ला अंदाजे 5 वाजता घडली.

या घटनेची माहिती होताच, त्वरित सर्व वनविभागाचे अधिकारी व पोलीस  विभागातील पोलिस निरीक्षक चव्हाण, वनविभागाचे अधिकारी विशाल सालकर व वनकर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. व पंचनामा करून शव विछेदनासाठी पाठविन्यात आले. मृत रघुनाथच्या मागे पत्नी व आई- वडील आहेत. या तरुणाच्या मृत्युने गावात हळहळ व्यक्क्त केले जात आहे.





  Print






News - Chandrapur




Related Photos