दहशतवादी ठिकाणांवर कारवाईच्या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वत: ॲक्शन रुममध्ये


वृत्तसंस्था / नवीदिल्ली :   भारतीय वायूसेनेच्या मिराज २००० या लढाऊ विमानांनी पहाटे साडेतीनच्या सुमारास पाकिस्तानव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी ठिकाणांवर मोठी कारवाई केली आहे.   दरम्यान   पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निगराणीखाली हा हल्ला करण्यात आला. नरेंद्र मोदी स्वत: ॲक्शन रुममध्ये हजर होते, अशी माहिती प्राप्त झाली आहे. 
 भारतीय वायूसेनेच्या विमानांनी  पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या तळावर १००० किलोग्रॅम वजनाचे बॉम्ब फेकले. १२ मिराज विमानांनी पाक हद्दीत घुसून दहशतवादी तळावर हल्ले केले. या हल्ल्यात जैश ए मोहम्मदची अल्फा ३ कंट्रोल रूम पूर्णपणे उद्धवस्त झली. या हल्ल्यात जवळपास ३०० दहशतवादी ठार करण्यात आले आहेत. ठार करण्यात आलेल्यांमध्ये जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मसूद अझहरचा मेहुणा युसूफ अझहरचाही समावेश आहे. 



  Print






News - World | Posted : 2019-02-26






Related Photos