महत्वाच्या बातम्या

 जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्रासाठी प्रस्ताव आमंत्रित


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / भंडारा : दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम २०१६ या कायद्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्यासाठी तसेच सर्व २१ प्रकारच्या दिव्यांग व्यक्तींना मुख्य प्रवाहात टिकवून ठेवण्यासाठी गरजेनुसार पुनर्वसनात्मक सहायभूत सेवा विहित कालावधीमध्ये मिळण्याकरिता दिव्यांग सक्षमीकरण, सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालय, भारत सरकारच्या Scheme for Implementation of Rights of Persons with Disabilities Act 2016 (SIPDA) योजनेंतर्गत भंडारा जिल्ह्यात दिव्यांग व्यक्तीकरिता शासनमान्य जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र स्थापन करावयाचे आहे. त्याअनुषंगाने जिल्हा समाज कल्याण विभाग, जिल्हा परिषद, भंडाराच्या वतीने जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र चालविण्यासंदर्भात नामांकित नोंदणीकृत स्वयंसेवी संस्था, अशासकीय संस्था यांच्याकडून अर्ज मागविण्यात येत आहे.

सदर केंद्राच्या तपशीलवार अटी व शर्ती, जाहिरात स्वरुप आणि कामाची व्याप्ती याची संपूर्ण माहिती bhandarazp.org आणि bhandarazp.nic.in या संकेतस्थळावर पाहता येईल. जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र स्थापनेची उद्दिष्टे व आवश्यक असलेल्या अटी व शर्ती पूर्ण करु शकणाऱ्या संस्थांनी वृत्त प्रकाशित झाल्याच्या दिनांकापासून १० दिवसात सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत जिल्हा समाज कल्याण विभाग, जिल्हा परिषद भंडारा येथे सादर करावे. असे जिल्हा समाज कल्याण अधिकारी मनिषा कुरसंगे यांनी कळविले आहे.





  Print






News - Bhandara




Related Photos