महत्वाच्या बातम्या

 आरटीओच्या जळालेल्या व  भिजलेल्या अभिलेख्यांचा लिलाव


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / वर्धा : उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या आगीत अर्धवट जळालेल्या व भिजलेल्या अभिलेख्यांचा लिलाव केला जाणार आहे. त्यासाठी ईच्छूक खरेदीदारांकडून उद्या १४ जून रोजी सायंकाळी ५ वाजतापर्यंत दरपत्रक मागविण्यात आले आहे.

उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाला रविवारी सायंकाळी अचानक आग लागली होती. या आगीत कार्यालयाचे अभिलेखे अर्धवट जळाले आहे. जळालेले अभिलेखे आग विझविण्याच्या प्रयत्नात भिजले आहे. अर्धवट जळालेल्या व भिजलेल्या या सर्व अभिलेख्यांचा आहे त्या स्थितीत लिलाव करण्यात येणार आहे. त्यासाठी उद्या १४ जून रोजी सायंकाळी ५ वाजता पर्यंत खरेदीदारांकडून लिलावासाठी दरपत्रक मागविण्यात आले आहे.

खरेदीदार त्यापुर्वी खरेदी करावयाचे अभिलेखे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालय, प्रशासकीय ईमारत, पहिला माळा, येथे समक्ष पाहू शकतील. इच्छूक खरेदीदारांना आपले दरपत्रक सायंकाळी ५ वाजता पर्यंत याच कार्यालयात सादर करावे लागेल. सायंकाळी ५ नंतर लगेच निविदा उघडण्यात येतील, असे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी कळविले आहे.





  Print






News - Wardha




Related Photos