गडचिरोली येथील पोलीस उपनिरीक्षक वर्षा नैताम ठरल्या राज्यपातळीवर तेजस्वीनी कन्या


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी/ गडचिरोली :
महिला आर्थीक विकास महामंडळ मुंबई दवारे  २४ फेब्रुवारी  रोजी माविम च्या ४४  व्या वर्धापन दिनानिमित्य नागपूर विभागातर्फे तेजस्विनी कन्या पुरस्कार करीता राज्यपातळीवर पोलीस अधिक्षक कार्यालया गडचिरोली  येथील पोलीस उपनिरिक्षक (नक्षल सेल)   वर्षा  तुकाराम नैताम  यांची राज्यपातळीवर समितीद्वारे  एकमताने निवड करण्यात आली आहे . 
सदर पुरस्कार  वर्षा नैताम यांना मुंबई येथे  २४ फेब्रुवारी  रोजी मान्यवरांच्या  हस्ते वितरित करण्यात येणार आहे. वर्षा नैताम ह्या  ज्ञानगंगा स्वयंसहायता महिला बचत गट वसा ता.जि.गडचिरोली येथील  शोभा तुकराम नैताम यांच्या कन्या  आहेत. माविम गडचिरोली व्दारे १९९८  मध्ये महाराष्ट्र ग्रामीण पतपुरवठा कार्यक्रम अंतर्गत सदर बचत गटाची स्थापना करण्यात आली. तर  वर्षा हया क्रांतीकारी स्वयंसहायता महिला बचत गट वसा ता.जि.गडचिरोली येथे २००६  पासून सदस्य आहेत.  सदर पुरस्कार स्विकारण्याकरिता आपल्या पोलीस उपनिरिक्षक कन्येसोबत  शोभा तुकाराम नैताम ह्या वसा   येथून मुंबई करिता आज प्रस्थान करणार आहेत.  वर्षा नैताम यांना माविम परिवाराने   शुभेच्छा दिल्या आहेत.   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-02-22


Related Photos