आजचे दिनविशेष
८ जून महत्वाच्या घटना
१६७० : पुरंदरच्या तहात गमावलेला रोहिडा किल्ला शिवाजी महाराजांनी परत जिंकून घेतला.
१६२४ : पेरू येथे भूकंप.
१७०७ : औरंगजेबाच्या मृत्यूनंतर मुअज्जम आणि आझमशाह या त्याच्या दोन मुलांमधे दिल्लीच्या तख्तासाठी युद्ध झाले. यात मुअज्जमने आझमशाहला ठार करुन दिल्लीची गादी बळकावली.
१७१३ : मुघलांनी १६८९ मधे जिंकलेला रायगड किल्ला पंतप्रतिनिधी यांनी सिद्दीकडुन राजकारणाने जिंकुन घेतला.
१७८३ : आईसलँड मधील लाकी ज्वालामुखीचा उद्रेक, हजार ठार.
१९१२ : कार्ल लेम्ले यांनी यूनिव्हर्सल पिक्चर्स या कंपनीची स्थापना केली.
१९१५ : लोकमान्य टिळकांनी मंडालेच्या तुरुंगात असताना लिहुन पूर्ण केलेल्या गीतारहस्य या ग्रंथाचे गायकवाडवाड्यात प्रकाशन झाले.
१९१८ : नोव्हा अॅक्विला या सर्वाधिक तेजस्वी तेजोमेघाचा शोध.
१९४१ : दुसरे महायुद्ध – दोस्त राष्ट्रांनी सीरीया व लेबानॉन पादाक्रांत केले.
१९४८ : एअर इंडिया ची मुंबई – लंडन विमानसेवा सुरू झाली.
१९४८ : जॉर्ज ऑर्वेलची १९८४ या नावाची कांदबरी प्रसिद्ध झाली.
१९५३ : कृष्णवर्णीयांना हॉटेलमधे सेवा नाकारण्यास अमेरिकन सर्वोच्च न्यायालयाने बंदी घातली.
१९६९ : लष्करप्रमुख म्हणून सॅम माणेकशा यांची नियुक्ती.
१९९२ : पहिल्यांदा जागतिक महासागर दिन साजरा केला गेला.
२००४ : आधुनिक काळातील शुक्राचे (सूर्यावरुन) पहिले अधिक्रमण झाले. याआधीचे अधिक्रमण १८८२ या वर्षी झाले होते.
८ जून जन्म
१९०६ : भारतीय क्रिकेट खेळाडू सैयद नझीर अली यांचा जन्म.
१९१० : लेखक, तत्त्वचिंतक व समीक्षक दिनकर केशव तथा दि. के. बेडेकर यांचा जन्म. (मृत्यू: २ मे १९७३)
१९१५ : भारतीय पत्रकार, लेखक, आणि कवी काययार सिंहनाथ राय यांचा जन्म. (मृत्यू: ९ ऑगस्ट २०१५)
१९१७ : भावगीत गायक गजाननराव वाटवे यांचा जन्म. (मृत्यू: २ एप्रिल २००९)
१९२१ : इंडोनेशियाचे दुसरे राष्ट्राध्यक्ष सुहार्तो यांचा जन्म. (मृत्यू: २७ जानेवारी २००८)
१९२५ : अमेरिकन राष्ट्राध्यक्ष जॉर्ज बुश यांची पत्नी बार्बरा बुश यांचा जन्म.
१९३२ : इंग्लिश क्रिकेटपटू रे इलिंगवर्थ यांचा जन्म.
१९३६ : नोबेल पारितोषिक विजेते अमेरिकन भैतिकशास्त्रज्ञ केनिथ गेडीज विल्सन यांचा जन्म.
१९५५ : वर्ल्ड वाईड वेब चे जनक टिम बर्नर्स-ली यांचा जन्म.
१९५७ : चित्रपट अभिनेत्री डिंपल कपाडिया यांचा जन्म.
१९७५ : भारतीय अभिनेत्री आणि निर्माता शिल्पा शेट्टी यांचा जन्म.
८ जून मृत्यू
६३२ : ६३२ई.पुर्व : इस्लाम धर्माचे संस्थापक मोहंमद पैगंबर यांचे निधन.
१७९५ : फ्रान्सचा राजा लुई १७ वा यांचे निधन. (जन्म: २७ मार्च १७८५)
१८०९ : अमेरिकन विचारवंत राजकारणी थॉमस पेन यांचे निधन. (जन्म: २९ जानेवारी १७३७)
१८४५ : अमेरिकेचे ७वे राष्ट्राध्यक्ष ॲन्ड्रयू जॅक्सन यांचे निधन. (जन्म: १५ मार्च १७६७)
१९९५ : रंगभूमी कलावंत एकपात्री प्रयोगकार राम नगरकर यांचे निधन.
१९९८ : नायजेरियाचे राष्ट्राध्यक्ष सानी अबाचा यांचे निधन.
News - todayspecialdays