महत्वाच्या बातम्या

 पोस्टे गोंडपिपरी येथे एन.डी.पी.एस. ॲक्ट नुसार कार्यवाही


- कर्नाटक येथील युवकास अवैध गांजा सह अटक

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / चंद्रपूर : ३ जून २०२३ रोजी पोलीस स्टेशन गोंडपिपरी येथील ठाणेदार जिवन राजगुरु सहायक पोलीस निरीक्षक यांना खबर मिळाली की, मुलचेरा ते गोंडपिपरी येणारी एका प्रवासी बस मध्ये एक इसम बॅग मध्ये गांजा हा अमली पदार्थ घेवुन येत आहे. अशा खात्रीशिर खबरेवरुन सपोनि जिवन राजगुरु सोबत पोलीस स्टॉफ पोहवा मनोहर मत्ते ब.नं. १५०, पोहवा शामराव पुलगमदार ब.नं. २०१९८, पोना जिवन आचेवार ब.नं. २१२२, पोना विलास कोवे ब.नं. २४१९, पोशि प्रेम चव्हाण ब.नं. २२११ यांचे गोंडपिपरी ते चंद्रपूर जाणाऱ्या राज्यमार्गावर तहसील कार्यालय गोंडपिपरीचे समोर नाकाबंदी करुन पंचासह छापा कारवाई केली असता सदर बस मध्ये एक पिवळया रंगाचा टी-शर्ट घातलेला इसम त्याचे हातात निळया रंगाची बॅग घेवुन बसुन असलेला दिसुन आल्याने त्याची पंचासमक्ष चौकशी केली असता सदर इसम अलोक आनंद मंडल (२१) रा. आर. एच. कॅम्प २ पोष्ट जवलगेरा ता. सिंदानुर जि. रायचुर (कर्नाटक राज्य) हा त्याचे ताब्यातील बॅग मध्ये ६ हजार ४५६ किलो ग्राम गांजा अंमली पदार्थ किंमत ६६ हजार ५०० रुपयाचा माल अवैध रित्या बाळगुन प्रवास करत असल्याचे मिळुन आल्याने त्याचे विरुध्द पोलीस स्टेशन गोंडपिपरी येथे गुंगीकारक औषधी द्रव्ये आणि मनोव्यापारांवर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम १९८५ कलम ८ (क) २० (ब) (i) प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला असुन पुढील तपास सपोनि जिवन राजगुरु ठाणेदार पो.स्टे. गोंडपिपरी हे करीत आहे. 

सदरची कार्यवाही पोलीस अधीक्षक रविंद्रसिंह परदेशी, अपर पोलीस अधीक्षक रिना जनबंधु व उपविभागीय पोलीस अधिकारी राजुरा यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि जिवन राजगुरु व गोंडपिपरी पोलीसांनी केली आहे. 





  Print






News - Chandrapur




Related Photos