महत्वाच्या बातम्या

 अवैधरित्या गांजाची तस्करी : सात किलो गांज्यासह आरोपीस अटक 


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / मुलचेरा : अवैधरित्या गांजाची तस्करी करत असल्या बाबतच्या माहितीची शानिशा करून लगेच दोन सरकारी पंचासह वजन मपे घेवुन रवाना होवु सापळा लावला असता एक इसम आनंद सपन मंडल वय ४८ बंगाली कॅम्प जिल्हा रायचूर कर्नाटक यास मालासह ताब्यात घेतले. सदर इसमाकडे साधारणतः सात किलो गांजा आढळून आला आहे.
तसेच सदर इसमा सोबत असणारा अन्य एक इसम हा पळून गेला. गोडपिंपरी पोलीस ठाणे येथील प्रभारी अधिकारी जिवन राजगूरू यांच्या संपर्कात राहून सदर ठिकाणी नाकाबंदी लावून दुसराही इसम आलोक आनंद मंडल यास गोंडपिंपरी पोलीस ठाणे यांनी ताब्यात घेतला आहे.
सदर प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू असून गांजा ताब्यात घेतला. आरोपी हा कर्नाटक राज्यात नेत असल्याचे प्रथमदर्शित दिसत असून सदरच्या गांजा कुठून उपलब्ध झाला, याचा तपास पोलीस करीत असून लवकरच पुढील आरोपींचा शोध लागेल, असा विश्वास पोलिसांनी दर्शविलेला आहे.





  Print






News - Gadchiroli




Related Photos