महत्वाच्या बातम्या

 विहारातून अधिकारी घडावे : आ. धर्मराव बाबा आत्राम यांचे प्रतिपादन


- बोरी येथे बौद्ध विहाराचे भूमिपूजन

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

तालुका प्रतिनिधी / अहेरी : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी शिक्षणातून समाजाचा व देशाचा कायापालट केले असून बौद्ध विहारातून अधिकारी घडावे, असे प्रतिपादन आमदार धर्मराव बाबा आत्राम यांनी केले. ते बुधवार २४ मे रोजी अहेरी तालुक्यातील बोरी येथे बौद्ध विहाराच्या भूमिपूजन प्रसंगी उदघाटनीय स्थानावरुन बोलत होते.

भूमिपुजन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बोरी ग्राम पंचायतीचे सरपंच शंकर कोडापे हे होते. तर प्रमुख अतिथी म्हणून मंचावर बौद्ध समाजाचे अध्यक्ष गोपाळा चांदेकर, उपसरपंच पराग ओलाल्लवार, राजपुर पैचचे सरपंचा मिनाताई वेलादी, महेश बाकीवार,  सुरेंद्र अलोणे, अशोक वासेकर, विजय कोकिरवार, नागेश पुल्लीवार, राहुल फुलझेले, लिंगाजी दुर्गे, साईनाथ अलवलवार, महेश सेडमाके, साईबाबा मड़ावी, कार्तिक कुक्कूडकर आदी मान्यवर उपस्थित होते.

उदघाटनीय स्थानावरुन बोलताना आमदार धर्मराव बाबा आत्राम म्हणाले कि, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी शिका, संघटीत व्हा व संघर्ष करा असा मूलमंत्र दिले असून प्रत्येकांनी उत्तमोत्तम शिक्षण घेऊन समाजाचा सर्वांगीण विकास साधावे व बौद्ध विहारातून भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी घड़ावे व निर्माण व्हावे, असा आशावाद व्यक्त करून राज्याचा सामाजिक न्याय विभागाचा राज्यमंत्री असतांना महत्त्वपूर्ण व ऐतिहासिक निर्णय घेतल्याचे व मागासवर्गीय समाजाच्या मुला-मुलींना शिक्षणासाठी योग्य सोयी-सुविधा उपलब्ध करून दिल्याचे आठवण करूण तथागत गौतम बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संघर्षमय जीवनावर प्रकाश टाकले व  बांधकाम पूर्ण झाल्यानंतर विश्वशांती तथागत गौतम बुद्ध यांची मुर्ती दान करणार असल्याचे आमदार धर्मराव बाबा आत्राम यांनी आवर्जून सांगितले. 

त्यानंतर आमदार स्थानिक विकास कार्यक्रम अंतर्गत मंजूर झालेल्या समाज मंदिराचे आमदार धर्मराव बाबा आत्राम यांनी कुदाळी मारून विधिवत भूमिपूजन केले. 

कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन पांडुरंग रामटेके यांनी केले. यावेळी पेंटू अलोणे, लक्ष्मण तावाड़े, दिलीप सोनटक्के, दिलीप झाड़े, राजेश दुर्गे आदी आणि मोठ्या संख्येने बौद्ध समाज बांधव व प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.





  Print






News - Gadchiroli




Related Photos