वर्धा येथील अट्टल गुन्हेगार `बच्चा`चा खून; शौचालयाच्या टाक्यात आढळला मृतदेह


- चितोडा मार्गावरील पुलफैल  येथील घटना
- अंगावर शस्त्राने वार केल्याच्या खुणा
विदर्भ न्यूज  एक्सप्रेस 
जिल्हा प्रतिनिधी / वर्धा :
येथील पुलफैल  येथे राहणारा अट्टल गुन्हेगार `बच्चा` उर्फ  मिलिंद  सुभाष मेश्राम (वय ५१) याचा काल रात्री त्याच्या राहत्या घरीच धारदार  शस्त्राचे वार करून राहत्या घरीच खून करण्यात आला. खून केल्यानंतर त्याचा मृतदेह त्याच्या घरासमोरील शौचालयाच्या टाक्यातील पाण्यात टाकलेला आढळून आला . पोलिसांनी या प्रकरणात संशयित म्हणून चार जणांना ताब्यात घेतले असून यात त्याच्या सावत्र मुलीचाही समावेश आहे.
 मुलीनेच मृतदेह शौचालयाच्या टाकीतील पाण्यात असल्याचे दाखविले.  त्याचे राहते घर म्हणजे झोपडीच आहे. त्याच्या राहत्या घरात जमिनीवर रक्ताचे थारोळे पडले होते. त्याशिवाय बच्चाचे दोन दात पडले होते. यावरून   त्याच्यासोबत घरातच जोरात हाणामारी झाल्याचे स्पष्ट झाले बच्चा मेश्राम याच्या पाठीवर धारदार शस्त्राचे आठ घाव होते. गळा चिरल्यासारखे दिसत होते. नाक फाडलेले होते. डोक्यावर तसेच छातीवरही वार होते. यावरून त्याचा अत्यंत निघृणपणे खून केल्याचे स्पष्ट दिसत होते.
बच्चा उर्फ  मिलिंद मेश्राम हा रेल्वेगाडीत चहा विक्रीचे काम करायचा. त्याला सगळेच बच्चा या टोपण नावानेच ओळखायचे. एक महिन्यापूर्वीच तो वर्ध्यात  परतला होता. त्यापूर्वी तो विशाखापट्टणम येथील कारागृहात १८  महिने बंदिस्त होता. दरम्यान काळात त्याच्या ुुपत्नीचे निधन झाले होते. तिच्यावरील अंत्यसंस्कार परिसरातील नागरिकांनी लोकवर्गणी करून केला होता. यावेळी मिलिंद मेश्राम हा  िवशाखापट्टणमच्या कारागृहातच होता. त्याला १६ वर्षीय स्वाती नावाची मुलगी आहे. तिच्या सोबतही मिलिंदचा सातत्याने वाद व्हायचा. त्यामुळे ती   नातेवाईकांच्या घरी राहायची. कालही तिचे वडिलांसोबत भांडण झाले होते. त्यामुळे ती गुरुवारीच  नातेवाईकांकडे  राहायला निघून गेली होती. आज पहाटे ती घरी आली तेव्हा तिला वडील घरी दिसले नाही. घरात रक्त पडलेले होते. शिवाय दोन दात पडून असल्याचे दिसले.तिने वडिलांचा शोध घेतला. त्याचवेळी तिने टाक्याजवळही पाहिले. त्यावेळी तिला वडिलांचा मृतदेह शौचालयाकरीता बांधलेल्या पाण्याच्या टाक्यात मिळाला.दरम्यान घराजवळ नागरिकांची गर्दी झाली होती. पोलिसांनी घरापासूनचे काही अंतर आवागमनास बंद केले होते. पोलिस श्वानपथकाला घेऊनच घटनास्थळी दाखल झाले. उपविभागीय पोलिस अधिकारी दिनेश कोल्हे, ठाणेदार चंद्रकांत मदने सहकाऱ्यांसह  घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी मृतदेह शवचिकित्सेकरीता जिल्हा सामान्य रुग्णालयात रवाना केला.

मृतदेह शौचालयाच्या टाक्यात कोणी टाकला?

त्याच्या झोपडीसारख्या घरासमोरच शौचालयाचे टाके असून त्यावरील स्लॅबवर  लहानसे चौकोनी छिद्र आहे. या छिद्रातूनच बच्चा उर्फ  मिलिंद मेश्राम याचा खून केल्यानंतर त्याचा मृतदेह टाक्यातील पाण्यात टाकला. पण एकट्याकडून हे शक्य होते काय, असा प्रश्न उपस्थित होतो. 

पोलिसांची कारवाई

त्याच्या घरासमोर झाडांची झुडपे आहेत. टाक्याजवळही झुडपे आहेत.त्यावर खर्रा खाऊन थुकल्याचे दिसले. त्याची पाने तसेच घरातील पडलेले दात रेडचीफ
कंपनीची  चप्पल पोलिसांनी जप्त केली. श्वानपथकाला घटनास्थळी आणल्यानंतर   श्वानाला खर्ऱ्याच्या  पिचकाऱ्या  असलेली दोन झाडांची पाने तसेच चपलांचा वास  देण्यात आला. पण कुत्रा घराशेजारीच घुटमळत होता.
घरापासून काही अंतरावर रेडचीफ कंपनीचा  महागडा चप्पलजोड मिळाला. ती चप्पल कोणाची व ती या घराजवळ कोणी टाकली, ही बाब पोलिसांच्या तपासातच स्पष्ट  होणार आहे. त्याची पाश्र्वभूमी गुन्हेगाराची होती.  Print


News - Wardha | Posted : 2018-08-24


Related Photos