महत्वाच्या बातम्या

 शासकिय आधारभूत धान खरेदी केंद्राचे खासदार अशोक नेते यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / गोंदिया : कृषि उत्पन्न बाजार समिती बनगांव (आमगांव) या ठिकाणी शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्र अंतर्गत रब्बी/उन्हाळी हंगाम २०२२-२३ वर्षाकरिता धान खरेदीचे शुभारंभ आज २२ मे २०२३ ला गडचिरोली चिमुर लोकसभा क्षेत्राचे लोकप्रिय खा. अशोक नेते यांच्या हस्ते फित कापुन उद्घाटन सोहळा पार पडला.

यावेळी प्रामुख्याने कार्यक्रमाचे उद्घाटक खा. तथा राष्ट्रीय महामंत्री भाजपा अनु. जनजाती मोर्चाचे अशोक नेते, कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी आ. आमगांव-देवरी क्षेत्राचे मान. भेरसिंह नागपुरे, भाजपा जिल्हाध्यक्ष गोंदिया तथा सभापती केशवराव मानकर, माजी अध्यक्ष जि.प. गोंदिया विजय शिवणकर, पं.स.सभापती राजेंद्र गौतम, उपसभापती मोहरलाल चौधरी, संचालक संजय नागपुरे, संचालक सचिन अग्रवाल, संचालक सोमेश असाटी, ता. महामंत्री राजु पटले, प्र. सचिन गजानन चुटे तसेच कार्यकर्ते व समस्त कर्मचारी वृंद, कृषि उत्पन्न बाजार समिती आमगांव उपस्थित होते.





  Print






News - Gondia




Related Photos