महत्वाच्या बातम्या

 राष्ट्रीय जनगणनेत ओबीसी समाजाची स्वतंत्र रकाण्यात गणना करण्याची मागणी 


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / बल्लारपूर : ओबीसी समन्वय समिती बल्लारपूर च्या वतीने २०२१ च्या राष्ट्रीय जनगणनेत ओबीसी समाजाची स्वतंत्र रकाण्यात गणना करण्याबाबत  तहसीलदार बल्लारपूर यांच्या  मार्फत प्रधानमंत्री भारत सरकार तसेच गृहमंत्री भारत सरकार नई दिल्ली यांना निवेदन देण्यात आले. तसेच प्रतिलिपी मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य मुंबई, अध्यक्ष विधानसभा महाराष्ट्र राज्य मंत्रालय, गृहमंत्री महाराष्ट्र राज्य, मंत्री अन्य पिछडा वर्ग भटक्या जमाती महाराष्ट्, अध्यक्ष राष्ट्रीय पिछडा वर्ग आयोग नई दिल्ली यांना सुद्धा पाठविण्यात आले.


ओबीसी समन्वय समिती अध्यक्ष विवेक खुटेमाटे यांच्या नेतृत्वात निवेदन देण्यात आले. या वेळी मनोहर माळेकर, सुधीर कोरडे, उमेश भाऊ कडू, संजय वटाणे, सूर्यकांत साळवे, अमोल काकडे, शंकर काळे, राजेश बट्टे, शुभांगी तिडके, प्रकृती पाटील, सुनील खापणे, गणेश लांबट टेकाम, रणजीत धोटे, प्रभाकर कवलकर, रवींद्र देरकर, चंदू वाढई , सुनिल भटारकर, राजेंद्र गौरकार, अशोक भोयर तसेच ओबीसी समन्वय समितीचे मार्गदर्शक सदस्य कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.





  Print






News - Chandrapur




Related Photos