महत्वाच्या बातम्या

 राष्ट्रीय लोक अदालतीत १६६९ प्रकरणाचा आपसी तडजोडीने निपटारा


- कौटूंबिक हिंसाचाराच्या ५ प्रकरणांचा लोक अदालतीद्वारे निपटारा

- प्रकरणांमधील तडजोडीच्या रक्कमेचे मुल्य ३ कोटी ५९ लाख

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / वर्धा : राष्ट्रीय विधी सेवा समिती व महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरणच्या निर्देशानुसार तसेच प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश हेमंत गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली वर्धा न्यायिक जिल्ह्यामध्ये १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले होते. या अदालतीमध्ये १ हजार ६६९ प्रकरणे आपसी तडजोडीने निकाली काढण्यात आली असून तडजोड झालेल्या प्रकरणांमधील तडजोडीच्या रक्कमेचे मुल्य ३ कोटी ५९ लाख ९५ हजार ३०५ इतके आहे.

राष्ट्रीय लोक अदालतमध्ये दोन्ही पक्षकारांना आपापली बाजु मांडण्याची संधी मिळते तसेच दोन्ही पक्षकारांच्या आपसी सहमतीने प्रकरणांमध्ये तडजोड होत असल्याने निकालाचे समाधान दोन्ही पक्षकारांना असते. तसेच यामुळे पक्षकारांचा वेळ व पैशाची बचत होते. मनासारखा समझोता झाल्याने मानसिक समाधान लोक अदालतमुळे पक्षकारांना मिळते, असे विचार प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश हेमंत गायकवाड यांनी विशेष लोक अदालत प्रसंगी व्यक्त केले.

जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव संजीव सरदार यांनी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यामागील भुमिका याप्रसंगी व्यक्त केली. विशेष लोक अदालतीमध्ये निकाली निघणाऱ्या प्रकरणांमुळे पक्षकारांना समाधान लाभते. कारण दोन्ही पक्षकारांच्या आपसी सहमतीने प्रकरणामध्ये समझोता होत असतो. त्यामुळे वादापेक्षा समझोता बरा या विचारानुसार पक्षकारांनी आपसातील वाद सामोपचाराने लोक अदालतीमध्ये मिटवावे, असे आवाहन त्यांनी केले.

विशेष लोक अदालतीमध्ये जिल्हा अधिवक्ता संघाचे अध्यक्ष, जिल्हातील अधिवक्ता आणि पक्षकारांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. या राष्ट्रीय लोकअदातीत न्यायालयामध्ये प्रलंबित प्रकरणांपैकी १ हजार ३७३  इतकी प्रकरणे आपसी तडजोडीने निकाली काढण्यात आली. सदरहू तडजोड झालेल्या प्रकरणांमधील तडजोडीच्या रक्कमेचे मुल्य १ कोटी ६१  लाख १७ हजार ५५६ इतके होते. तसेच वाद दाखल पुर्व प्रकरणापैकी २९६ इतकी प्रकरणे आपसी तडजोडीने निकाली काढण्यात आली. वाद दाखल पुर्व प्रकरणांमधील तडजोडीचे मुल्य १ कोटी ९८ लाख ७७ हजार ७४९ इतके आहे.

या लोकअदालतीची विशेष बाब म्हणजे जिल्ह्यातील न्यायालयामध्ये प्रलंबित असलेल्या कौटूंबिक हिंसाचाराच्या ५ प्रकरणामध्ये पती पत्नी मध्ये असलेले वाद या लोक अदालतीद्वारे निपटारा करण्यात यश प्राप्त झाले व त्यांनी हसत खेळत आपले संसार करण्याचे ठरविले. असल्याचे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणच्यावतीने कळविण्यात आले आहे.





  Print






Related Photos