नाटककारांनी समाजाचे प्रतिबिंब नाटकात उतरवून समाजाला दिशा देण्याचे कार्य करावे : डाॅ. परशुराम खुणे


- म. फुले महाविद्यालयात नाट्य तंत्र लेखन कार्यशाळा
- दर्जेदार नाट्यकृतींची अपेक्षा, मान्यवरांनी केले मार्गदर्शन
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / आष्टी :
समाज हे चालते फिरते विद्यापीठ असून नवीन निर्माण होणाऱ्या नाटककारांनी समाजाचे बारकाईने निरीक्षण करून समाजाचे प्रतिबिंब नाटकात उतरवून समाजाला दिशा देण्याचे कार्य करावे, असे आवाहन झाडीपट्टीतील थोर नाट्यकलावंत डाॅ. परशुराम खुणे यांनी केले. 
महात्मा ज्योतिबा फुले कला महाविद्यालय आष्टी च्या मराठी विभाग तथा महाराष्ट्र राज्य साहित्य आणि सांस्कृतिक विभागाच्या विद्यमाने आयोजित राज्यस्तरीय दोन दिवसीय नाट्य लेखन तंत्र कार्यशाळेच्या उद्घाटनाप्रसंगी बोलत होते. 
अध्यक्षस्थानी वनवैभव शिक्षण मंडळाचे उपाध्यक्ष अब्दूल जमीर अब्दूल हकीम होते. कार्यशाळेचे बिजभाषक नाटककार तथा महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ मुुंबईचे डाॅ. ईश्वर नंदपुरे, प्राचार्य संजय फुलझेले, प्राचार्य श्याम माहोरकर, नाटककार श्रीपाद जोशी, नाटककार प्रा. सलीम शेख, प्रा.डाॅ. गजानन कोर्तलवार, प्रा.डाॅ. संतोष देठे उपस्थित होते.
दोन दिवसीय नाट्यतंत्र लेखन कार्यशाळेत नाट्यलेखन तंत्र या सत्राच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ समीक्षक प्राचार्य श्याम मोहोरकर होते. नाट्य लेखन तंत्र या विषयावर नाटककार व कलावंत श्रीपाद जोशी, नाट्य संहीता ते नाट्यप्रयोग या विषयावर नाटककार, चित्रपटलेखक व कलावंत प्रा. सलीम शेख, नाटकातील संवाद व भाषा या विषयावर प्रा.डाॅ. गजानन कोर्तलवार यांनी मार्गदर्शन केले.
लघून नाट्यलेखन या सत्राच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ समीक्षक, नकलाकार, नाट्यकलावंत प्रा.डाॅ. दिलीप अलोणे होते. एकांकीका लेखन या विषयावर नाट्यलेखक प्रा.डाॅ. राजकुमार मुसणे , पथनाट्य व एकपात्री लेखन या विषयावर लोककलावंत, नकलाकार, श्रीराम गीरे यांनी प्रतिनिधींना सखोल मार्गदर्शन केले. 
झाडीपट्टी रंगभूमी आणि नाट्यलेखन या सत्राच्या अध्यक्षस्थानी अभ्यासक प्रा.डाॅ. हिराजी बनपुरकर होते. नाट्यकलावंत व नाटककार गडपल्लीवार, नाटककार ताराचंद उराडे यांनी मार्गदर्शन केले. प्रत्यक्ष नाट्यकृतीचे लेखन व शंका निरसन यावर चर्चा करण्यात आली. समारोपीय कार्यक्रमात प्रसिध्द नाट्यकलावंत अनिल ओव्हाळ यांनी मार्गदर्शन केले. कार्यशाळेविषयी प्रा. चिन्नना चालुरकर, मिनाक्षी ठेंगणे, नारनवरे यांनी प्रतिक्रिया नोंदविली. संपूर्ण कार्यशाळेत ९० प्रतिनिधींनी नोंदणी केली. कार्यशाळेचे संयोजन प्रा.डाॅ. राजकुमार मुसने, प्रा.डाॅ. रवी शास्त्रकार, प्रा. ज्योती बोबाटे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्याकरीता प्रा.डाॅ. आर. आर. तुला, प्रा. श्याम कोरडे, प्रा.डाॅ. भारत पांडे, प्रा. डाॅ. गणेश खुणे, प्रा. नासिका गभने, प्रा. विजया बल्की, राज लखमापुरे, निलेश नाकाडे, अमर कांबळे, मोहम्मद मुस्ताक, संजिता बच्छाड, श्रिनिवास गोर्ला, संतोष बारापात्रे, अतुल लटारे, कौमुदी श्रीरामवार, फेमा सोमलकर, मीनाक्षी ठेंगणे, अमोल बोरकुटे यांनी सहकार्य केले.

   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-01-17


Related Photos