महत्वाच्या बातम्या

 चंद्रपूर : वादळी पावसामुळे रेल्वेची विद्युत वाहिनी तुटली, वाहतूक विस्कळीत प्रवाशांची गैरसोय


विदर्भ न्यूज एक्सप्रेस  

प्रतिनिधी / चंद्रपूर : जिल्ह्यात सलग चार दिवसापासून वादळी पाऊस सुरू आहे. सदर वादळी पावसाचा फटका रेल्वेला बसला आहे. वादळामुळे रेल्वे विद्युत वाहिनीची तार तुटली. त्यामुळे तीन तास प्रवासी गाड्यांची वाहतूक खोळंबली होती. यामुळे प्रवाशांची चांगलीच गैरसोय झाली.


वरोरा रेल्वे स्थानकापासून अवघ्या तीन किमी अंतरावर रेल्वे खांब क्र. ८३२ बी जवळ ओव्हरहेड तार तुटली. परिणामी या मार्गावरून चंद्रपूरकडे येणारी गाडी क्र. १२७९२ दानापूर-सिकंदराबाद गाडी दुपारी ३.१५ वाजता थांबली आणि ही गाडी थांबल्यामुळे या मार्गावर धावणाऱ्या इतर गाड्या क्र. १२६५५ अहमदाबाद ते महाबलीपुरम नवजीवन एक्स्प्रेस आणि इतर दोन गाड्या मध्यावर थांबवाव्या लागल्या. माहिती मिळताच रेल्वे तंत्रज्ञांचे पथक पोहोचले. दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.यामुळे दक्षिण भारताकडे जाणाऱ्या रेल्वे गाड्या तब्बल तीन तास उशिरा चालत आहे.





  Print






News - Chandrapur




Related Photos