पी.सी.आर. दरम्यान आरोपीकडून ४ लाख २० हजारांचा माल हस्तगत : स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
जिल्हा प्रतिनिधी / वर्धा :
पोलीस स्टेशन सेवाग्राम हद्दीतील परिसरात सतत होणाऱ्या घरफोडया, चोऱ्या चा छडा लावण्यासाठी पोलिस अधिक्षक डाॅ. बसवराज तेली व अपर पोलिस अधिक्षक निखील पिंगळे यांनी स्थानिक गुन्हे शाखेला सुचना दिल्या होत्या, त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तपास करून आरोपीला अटक केली व पी.सी.आर. दरम्यान आरोपीकडून ४ लाख २० हजारांचा माल हस्तगत केला आहे .  संजय मधुकर मून (५०)  रा. बेला ता. उमरेड जि. नागपूर असे आरोपीचे नाव आहे . 
 सन २०१८ साली  धन्वंतरी नगर, वैशाली नगर, कपीलवास्तु सोसायटी, सुतगिरणी लेआॅउट, मसाळा, वरूड , सोहम नगर बरबडी या परिसरात सतत होणाऱ्या घरफोडया, चोऱ्यांचा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे देण्यात आला. त्यानुसार ३ जानेवारीला पथकाला मिळालेल्या माहितीप्रमाणे संशयीत इसम नामे संजय मुन, रा. नागपूर यांस ताब्यात घेतले व विचारपूस अंती पो.स्टे. सेवाग्राम गुन्हा दाखल करून आरोपीला अटक करण्यात आली. त्याला न्यायालयाकडून  ४ ते ११ जानेवारी पर्यंत पी.सी.आर. घेण्यात आला. तपासादरम्यान एकूण १३ गुन्हयातील चोरीस गेलेले अंदाजे १३५ ग्रॅम सोने, ८५ ग्रॅम चांदी असा एकूण ४ लाख २० हजार रुपयांचा  मुद्देमाल कौषल्यपूर्णरित्या हस्तगत करण्यात आला. 
सदरची कारवाई पोलिस अधिक्षक डाॅ. बसवराज तेली व अपर पोलिस अधिक्षक  निखील पिंगळे यांचे मार्गदर्शनात व पोलिस निरीक्षक निलेसहा  ब्राम्हणे यांचे निर्देशाप्रमाणे पोउपनि पंकज पवार, महेेंद्र इंगळे, स.फौ.उदयसिंग बारवाल, नामदेव किटे, संजय देवरकर, पोहवा. परवेज खान, दिवाकर परिमल, नरेंद्र डहाके, हरीदास काकड, नापोशी . आनंद भस्मे, अमर लाखे, वैभव कटृोजवार, अमित षुक्ला, सचिन खैरकार, कुलदिप टांकसाळे, निलेश  कट्टोजवार, अक्षय राउत, आत्माराम भोयर, विलास लोहकरे, गणेश  खवले, मपोशी सोनम कांबळे यांनी केली.  Print


News - Wardha | Posted : 2019-01-11


Related Photos