महत्वाच्या बातम्या

 जलसंवर्धन योजनेत महाराष्ट्र देशात आघाडीवर


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

वृत्तसंस्था / नवी दिल्ली : महाराष्ट्रात एकूण ९७ हजार ६२ पैकी ९६ हजार ३४३ म्हणजे ९९.३ टक्के जलसाठे ग्रामीण भागात, तर फक्त ७१९ म्हणजे ०.७ टक्के शहरी भागांमध्ये असल्याचे देशात प्रथमच करण्यात आलेल्या लहानमोठ्या जलसाठ्यांच्या गणनेतून स्पष्ट झाले.

राज्यातील ९९.७ टक्के म्हणजे ९६ हजार ७६७ जलसाठे सार्वजनिक, तर २९५ म्हणजे ०.३ टक्के खासगी मालकीची आहेत. जलसंवर्धनाच्या योजनांच्या अंमलबजावणीत महाराष्ट्र आघाडीवर आहे. देशात सर्वाधिक पाणवठे आणि जलाशय पश्चिम बंगालमध्ये, सर्वाधिक तलाव आंध्र प्रदेशमध्ये, तर सर्वाधिक सरोवर तामिळनाडूमध्ये आहेत.





  Print






News - Rajy




Related Photos