महत्वाच्या बातम्या

 ग्रामपंचायत पिंडकेपार ता. गोरेगाव येथे विविध विकासकामांचे भूमिपूजन संपन्न


- आमचा पायाभूत सुविधा उभारण्यात भर : माजी मंत्री राजकुमार बडोले


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / गोरेगाव : ग्रामपंचायत पिंडकेपार ता. गोरेगाव येथे विविध विकासकामांचा भूमिपूजन सोहळा राज्याचे माजी सामाजिक न्याय मंत्री व गोंदिया जिल्ह्याचे माजी पालकमंत्री राजकुमार बडोले यांच्या हस्ते संपन्न झाले. दरम्यान आमचा पायाभूत सुविधा उभारण्यावर भर आहे असे प्रतिपादन माजी मंत्री राजकुमार बडोले यांनी केले. गावात आणखी काही कार्य करावयाचे असल्यास माझ्यासाठी संपर्क करावा असे आवाहन सुद्धा राजकुमार बडोले यांनी केले. भूमिपूजन केलेल्या कामात सोलर पंप यूनीट बसविणे १८ लक्ष रुपये, सिमेंट काँक्रिट नाली बांधकाम १२ लक्ष रुपये, रस्ता खडीकरण २० लक्ष रुपये, कन्हारटोला येथे शाळा इमारत वर्गखोली बांधकाम १२ लक्ष रुपये कामांसाठी मंजूर करण्यात आले असून भूमिपूजन करून कामांची सुरुवात करण्यात आली.

यावेळी गोरेगाव पंचायत समितीचे सभापती इंजि. मनोजजी बोपचे, जि. प. सदस्य डॉ. लक्ष्मणजी भगत, पंचायत समिती सदस्य शितल बिसेन, पंचायत समिती सदस्य रामेश्वर महारवाडे, माजी उपसभापती सुमेंद्र बिसेन, धनलाल बिसेन, श्रीराम भैराम, राजेन्द्र मेश्राम, लोकचंद बघेले, तेजेंद्र हरिणखेडे माजी सरपंच कटंगी, मेशजी बिसेन, एच.आर. पटले सर, खुमेंद्र बिसेन, तेजराम बघेले तसेच ग्रामपंचायत सदस्य व गावकरी मंडळी उपस्थित होते.





  Print






News - Gondia




Related Photos