राज्याला अधोगतीकडे नेणाऱ्या महाविकास आघाडी सरकारचा तीव्र निषेध : आ. डॉ. देवराव होळी


- भारतीय जनता पार्टी जिल्हा गडचिरोली कार्यकारिणी समितीच्या बैठकीमध्ये  महाविकास आघाडी सरकारच्या निषेधाचा प्रस्ताव 

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली :
राज्यात अपघाताने सत्तेत आलेल्या महाविकास आघाडी सरकारने प्रगतशील महाराष्ट्राला अधोगतीकडे नेण्याचा घाट घातला असून त्यांच्या भ्रष्टाचारी स्वभावामुळे राज्य अधोगतीकडे चालले आहे. त्यामुळे या सरकारचा करावा तेवढा निषेध कमी असल्याचे प्रतिपादन गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ. देवराव होळी यांनी केला. भारतीय जनता पार्टी गडचिरोली जिल्हा कार्यकारिणी समितीच्या बैठकीमध्ये या संबंधीत प्रस्तावावर ते बोलत होते.
या बैठकीला विदर्भ प्रदेश संघटनमंत्री डॉ. उपेंद्रजी कोठेकर, विधानपरिषदेचे आमदार तथा गडचिरोली जिल्हा प्रभारी डॉ. रामदासजी आंबटकर, भाजपा जिल्हाध्यक्ष किसनजी नागदेवे, खासदार अशोक नेते, गडचिरोलीचे आमदार डॉ. देवराव होळी, आरमोरीचे आमदार कृष्णा गजबे, सहकार महर्षी प्रकाश सावकार पोरेड्डीवार, भाजपाचे ज्येष्ठ नेते बाबुराव कोहळे, आदिवासी आघाडीचे प्रदेश महामंत्री प्रकाश गेडाम, जिल्ह्याचे महामंत्री रवींद्र ओल्लारवार  गोविंद सारडा, प्रशांत वाघरे, प्रमोद पिपरे, किसान आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्राध्यापक रमेश बारसागडे, ज्येष्ठ नेते रमेश भूरसे, सदानंद कुथे, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा सौ. योगिता भांडेकर, भाजपा महिला आघाडीच्या नेत्या सौ रेखा डोळस, माजी नगर परिषद अध्यक्ष सौ योगिता पिपरे, शहर अध्यक्ष मुक्तेश्वर काटवे मंचावर प्रामुख्याने उपस्थित होते.
राज्यातील महाविकास आघाडी सरकार हे सत्तेत आल्यापासून केंद्रातील जन कल्याणाच्या योजना न राबविता त्या योजनांचा पैसा खाण्याचा काम हे सरकार करीत आहे. योजना पूर्ण न केल्याचा कांगावा करून त्याचे खापर केन्द्र सरकारवर फोडण्याचा प्रयत्न हे सरकार करीत आहे. मग ती प्रधानमंत्री आवास योजना असेल वा अन्य कोणतीही त्या योजनेच्या अंमलबजावणीसाठी कोणतेही काम हे सरकार करीत नाही त्यामूळे या सरकारचा निषेध करावा तेवढा कमी आहे. 
प्रत्येक क्षेत्रात भ्रष्टाचार माजलेला आहे, मोठ्याच नाही तर सर्वसामान्य लोकांकडून खंडणी वसूल करणे सुरू आहे, सरकारमधील अनेक मंत्री आज तुरुंगात  आहेत, अनेक मंत्र्यांवर गंभीर स्वरूपाचे आरोप असून अनेकांना त्यामूळे राजीनामा द्यावा लागला आहे. असे हे घोटाळेबाज सरकार असून या सरकारचा निषेध करावा तेवढा कमी आहे.
राज्यातील शेतकरी संकटात असताना त्यांना बोनस देणार नाही असे निर्लज्जपणे हे सरकार सांगत आहे, शेतीच्या बांधावर जावून शेतकऱ्यांना १ लाखाची मदत करू असे म्हणणाऱ्या या सरकारने घोषित केलेली कर्जमाफी देखील अजुनपर्यंत दिली नाही. दरवर्षी शेतकऱ्यांना देण्यात येणारा धानाचा बोनस या वर्षी या सरकारने नाकारला असे हे भ्रष्ट सरकार आहे. आतंकवादी लोकांना पैसे पुरविणारे मंत्री सरकार मध्ये आहेत व त्या मंत्र्यांना हे सरकार पाठीशी घालत आहे. अशाप्रकारे हे सरकार सर्व आघाड्यांवर अपयशी ठरले असून या सरकारचा निषेध करावा तेवढा कमी असल्याचे प्रतिपादन गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ. देवराव होळी यांनी केले.  Print


News - Gadchiroli | Posted : 2022-03-28
Related Photos