अयोध्येतील राम मंदिराबाबत आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी


वृत्तसंस्था / नवीदिल्ली :  अयोध्येतील राम मंदिर-बाबरी मशीद वादग्रस्त भूखंड प्रकरणी आज ४ जानेवारी रोजी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. याप्रकरणी दाखल १४ याचिकांवर सरन्यायाधीश रंजन गोगोई आणि न्या. एस. के. कौल यांच्या खंडपीठासमोर सुनावणी होणार आहे. 
अयोध्येतील वादग्रस्त २.७७ एकर भूखंडाची मालकी समप्रमाणात सुन्नी वक्फ बोर्ड, निर्मोही आखाडा आणि रामलल्ला यांना देण्याचा निर्णय अलाहाबाद उच्च न्यायालयाने सन २०१०मध्ये दिला होता. त्याला आव्हान देणाऱ्या १४ याचिकांवर जानेवारी २०१९च्या पहिल्या आठवड्यात सुनवाणी होईल, असे सर्वोच्च न्यायालयाने २९ ऑक्टोबर २०१८ रोजी जाहीर केले होते.   Print


News - World | Posted : 2019-01-04


Related Photos