महत्वाच्या बातम्या

 पालक-शिक्षक सभा उत्साहात संपन्न


- गोंडवाना सैनिकी विद्यालयात पालक सदस्यांची निवड; विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगती व सर्वांगीण विकासावर सविस्तर चर्चा

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली : गोंडवाना सैनिकी विद्यालय, गडचिरोली येथे पालक-शिक्षक सभा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली. विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती, शिस्त, उपस्थिती, शिष्यवृत्ती, विविध शासकीय योजना तसेच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाशी संबंधित विविध विषयांवर पालक व शिक्षक यांच्यात सविस्तर चर्चा करण्यात आली.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला देवी सरस्वतीच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची विधिवत सुरुवात करण्यात आली. त्यानंतर संगीत शिक्षक सुनील लोखंडे व त्यांच्या चमूने स्वागतगीत सादर करून उपस्थितांचे स्वागत केले.

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान विद्यालयाचे प्राचार्य मा. ओमप्रकाश संग्रामे यांनी भूषविले. प्रमुख अतिथी म्हणून पर्यवेक्षक अजय वानखेडे सर, सैनिकी निदेशक हरिप्रसाद ध्यानी व पोटवार उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्येष्ठ शिक्षक योगेश असमवार यांनी केले, तर रमण गागापूरवार यांनी आभार मानले.

सभेत विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीचा आढावा, नियमित उपस्थिती, शिस्त, अभ्यासातील सातत्य आणि परीक्षेतील कामगिरी याबाबत चर्चा करण्यात आली. विद्यार्थ्यांनी शिक्षणासोबतच क्रीडा, एनसीसी तसेच विविध सहशालेय उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घ्यावा, याबाबतही पालकांना मार्गदर्शन करण्यात आले.

यावेळी शिष्यवृत्ती, विविध शासकीय योजनांचा लाभ, आवश्यक कागदपत्रांची पूर्तता, आधार कार्ड, जात प्रमाणपत्र, पत्ता, छायाचित्र आदी कागदपत्रे जमा करणे, तसेच ग्रुप इन्शुरन्स व विद्यार्थ्यांच्या मोबाईल वापराबाबत आवश्यक सूचना करण्यात आल्या.

पालक-शिक्षक सभेदरम्यान इयत्ता ६ वी ते १२ वीपर्यंत पालक सदस्यांची निवड करण्यात आली. यामध्ये इयत्ता ६ वी अ चे विनोद एच. वासेकर, ६ वी ब च्या अर्चना श्रीकांत पावडे, ७ वी अच्या जयश्री पी. बांगर, ७ वी ब राहुल अल्तमा, ८ वी अ च्या वैशाली अशोक तेलकुन्तलवार, ८ ब वी चे विष्णू आर. बडे, ९ वी अचे महेंद्र कुकाडकर, ९ वी बचे श्यामराव अंकरे, १० वी अचे राहुल वाय. धनोळे, १० वी बचे जितेंद्र व्ही. मेश्राम, ११ वीच्या कोमल गणेश सितुळे आणि १२ वीचे संजय ई. लोनारे यांची पालक सदस्य म्हणून निवड करण्यात आली.

निवड झालेल्या पालक सदस्यांनी विद्यालयाच्या शैक्षणिक व इतर उपक्रमांना सहकार्य करण्याची भावना व्यक्त केली. विद्यार्थ्यांच्या अडचणी, शैक्षणिक गरजा तसेच त्यांच्या भविष्यातील प्रगतीसाठी आवश्यक उपाययोजनांवर पालक व शिक्षक यांच्यात सकारात्मक चर्चा झाली.

यावेळी प्राचार्य ओमप्रकाश संग्रामे सर यांनी विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी पालक, शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यातील समन्वय अत्यंत महत्त्वाचा असल्याचे सांगितले. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसोबतच शिस्त, संस्कार, क्रीडा आणि सर्वांगीण व्यक्तिमत्त्व विकासाकडे लक्ष देण्याचे आवाहन त्यांनी केले.

पर्यवेक्षक अजय वानखेडे सर, सैनिकी निदेशक हरिप्रसाद ध्यानी सर व पोटावार साहेब यांच्या उपस्थितीने कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले. पालक-शिक्षक सभेमुळे पालक व शिक्षक यांच्यातील संवाद अधिक दृढ झाला असून, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व सर्वांगीण विकासासाठी सकारात्मक वातावरण निर्माण झाले.





  Print






Related Photos