शेतकऱ्यांच्या देशाबाहेरील अभ्यास दौऱ्यासाठी २७ ऑगस्टला सोडत प्रक्रिया


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली : विदेशातील शेतीचा अभ्यास करण्यासाठी राज्यातील शेतकऱ्यांचे देशाबाहेर अभ्यास दौरे आयेाजित करण्यात येतात. राज्य पुरस्कृत सन २०२२६-२०२७ साठी, १५ ऑगस्ट २०२६ पर्यत अर्ज तालुका कृषी अधिकारी कार्यालयास सादर करण्याबाबत कळविण्यात आलेले होते. सदर प्राप्त प्रस्तावाची छाननी करुन २० ऑगस्ट २०२६ पर्यत परिपूर्ण अर्ज प्रस्ताव जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी कार्यालय, गडचिरोली येथे सादर करण्याबाबत सुचीत केलेले होते. त्याअनुषंगाने प्राप्त प्रस्तावातील जिल्ह्यातील पाच शेतकऱ्यांना अभ्यास दौरा करण्याची संधी मिळणार आहे.
त्याकरीता सुधारित २७ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी १२.०० वा. जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी कार्यालय, बॅरेक क्रं.१ कॉम्पलेक्स, गडचिरोली येथे जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, गडचिरोली यांचे अध्यक्षतेखाली सोडत प्रक्रिया आयोजित करण्यात आलेली आहे. असे जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, गडचिरोली, प्रिती हिरळकर यांनी कळविले आहे.




Petrol Price




