महत्वाच्या बातम्या

 जात प्रमाणपत्र पडताळणीबाबत वेबिनारचे आयोजन


- सामाजिक न्याय पर्व उपक्रम

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / वर्धा : सामाजिक न्याय विभागाच्या वतीन 1 एप्रिल ते 30 एप्रिल या कालावधीत सामाजिक न्याय पर्व साजरा करण्यात येत आहे. या पर्वा अंतर्गत जात प्रमाणपत्र पडताळणी मोहिम राबविण्यात येत आहे. त्यानुसार उद्या 6 एप्रिल रोजी दुपारी 4 वाजता वेबिनारचे आयोजन करण्यात आले आहे.

जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे अर्ज सादर करतांना विद्यार्थी, पालक व महाविद्यालयांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. प्रमाणपत्र मिळविण्यासाठी कराव्या लागणा-या प्रक्रियेची माहिती होण्यासाठी सदर सेमिनारचे आयोजन करण्यात आले आहे. प्रमाण पत्रासाठी अर्ज करण्यातील अडचणी या वेबीनारमुळे दूर होईल. ज्या विद्यार्थ्यांनी अद्याप जात प्रमाणपत्र पडताळणीसाठी अर्ज सादर केले नाही.

त्यांनी लवकरात लवकर अर्ज सादर करावे. जेणेकरुन समितीला सदर अर्ज तपासून वेळेत प्रमाणपत्र उपलब्ध करुन देणे सोईचे होईल. ज्या विद्यार्थ्यांनी अर्ज सादर केले आहे. परंतु परिपूर्ण कागदपत्र नसल्याने अर्ज नाकारले गेले आहे. अशा विद्यार्थ्यांनी समितीस प्रत्यक्ष भेट दयावी. तात्काळ त्रुटीची पुर्तता करावी. प्रमाणपत्र मिळविण्याच्या अनुषंगाने आयोजित झूम वेबीनारचा मिटींग आयडी 84531131525 तर पासकोड Wardha@321 असा आहे. या वेबीनार मध्ये सर्व महाविद्यालयाचे प्राद्यापक, संबंधीत कर्मचारी, पालक व विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन समितीचे उपायुक्त एस. एम. चव्हाण यांनी केले आहे.





  Print






News - Wardha




Related Photos