महत्वाच्या बातम्या

 रुग्णवाहिका उपलब्ध करून द्यावे : उपतालुका प्रमुख बालाजी सातपुते यांची मागणी


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर : बल्लारपूर तालुक्यातील, मौजा कवळजी-कीन्ही पासून ते गिलबिली-सातारा, तुकूम-सातारा भोसले गावांपर्यंत म्हणजेच तब्बल ३०- ३५ गावातील अत्यवस्थ रुग्णांना रूग्णवाहिकेसाठी तासन् तास ताटकळत राहावे लागते.  

सदर भागाला अंधारी व्याघ्र प्रकल्प लागून असल्याने, मानव जिवितहानी च्या छोट्या-मोठ्या घटना घडत असतात. परिणामी रुग्णांना, तातडीने रूग्णसेवा मिळावी. तसेच जिल्हा रुग्णालयापर्यंत रुग्णांना जलदगतीने पोहोचविता यावे.

याकरिता परिसरातील रुग्णांसाठी विशेष बाब म्हणून तातडीने एक रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्याची मागणी, बल्लारपूर शिवसेना उपतालुका प्रमुख बालाजी सातपुते यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पुर्व विदर्भ संपर्क प्रमुख किरण पांडव तसेच मुख्यमंत्री सहाय्यता वैद्यकीय मदत कक्ष प्रमुख मंगेश चिवटे, शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष प्रमुख रामहरी राऊत, शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष संपर्क प्रमुख जितेंद्र सातव यांच्याकडे केले आहे.





  Print






News - Chandrapur




Related Photos