महत्वाच्या बातम्या

 भद्रावती : ५ किलो गांजासह १ लाख ३७ हजाराचा मुद्देमाल जप्त


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / बल्लारपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती येथे ३ एप्रिल ला रात्री ८ वाजताच्या सुमारास चार आरोपीसह पाच किलो गांजा जप्त करण्यात आला. 

भद्रावती पोलिसांना गुप्त माहिती मिळाली की, चंद्रपूर वरून भद्रावती शहरात अमली पदार्थ विक्री करण्यासाठी येत आहेत. त्या आधारे पोलीस निरीक्षक विपिन इंगळे यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधीर वर्मा, शशांक बद्धमवार, जगदीश झाडे, रोहित चिटगिरे, आशिष गौरकार, मोनाली गारघाटे यांनी मुख्य महामार्गावरील पेट्रोल पंप जवळ सापळा रचला. चंद्रपूर वरून दोन मोटारसायकल वरून चार युवक येत आहेत. त्यांना थांबवून झडती घेतास त्यांच्या जवळ पाच किलो गांजा सापडला. आरोपीकडून पाच किलो गांजासह दोन मोटरसायकल, मोबाईल असा १ लाख ३७ हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

सौरभ दुर्वास कसारे वय २२ वर्ष, अदनान जाकीर शेख वय २१ वर्ष, लोकेश दौलत मानकर वय २२ वर्ष, राहुल दिलीप साखरे वय २१ वर्ष सर्व राहणार चंद्रपूर असे आरोपींची नावे आहे. पुढील कारवाई भद्रावती पोलीस करीत आहे.





  Print






News - Chandrapur




Related Photos