पोलिसांकडून शेतकऱ्यांना आधुनिक शेतीचे धडे, एका एकरात घेतले ३५ पोते धानाचे उत्पादन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली
: पेरमिली उपपोलिस ठाण्याच्या हद्दीतील चांदेकर या शेतकऱ्याच्या शेतात पोलिसांनी आधुनिक शेती तंत्रज्ञानाचे धडे देवून धानाची शेती केली आहे. यामुळे तब्बल ३५ पोते धानाचे उत्पादन झाले आहे. मागील वर्षी याच एका एकरात केवळ २ पोते धानाचे उत्पादन झाले होते.
पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे, अपर पोलिस अधीक्षक महेंद्र पंडीत, अपर पोलिस अधीक्षक हरी बालाजी, अपर पोलिस अधीक्षक बन्सल, अपर पोलिस अधीक्षक मोहित गर्ग, उपविभागीय पोलिस अधिकारी बजरंग देसाई यांच्या मार्गदर्शनात जिल्ह्यातील अतिदुर्गत भागात उपविभाग अहेरी अंतर्गत येत असलेल्या पेरमिली उपपोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी महेश मतकर व पोलिस जवान एकत्र येत आधुनित शेतीचे प्रशिक्षण देत आहेत. 
पोलिस उपनिरीक्षक मतकर यांनी रब्बी हंगामासाठी सरी पध्दतीने दोन गुंठे जागेवर मिरची चा डेमो प्लाॅंट तयार करून मिरची पिकांमध्ये कांद्याचे आंतरपिक घेण्याचा उपक्रम राबविला आहे. सदर प्रशिक्षणासाठी आलदंडी या गावातील शेतकऱ्यांनी पुढाकार घेतला आहे. पोलिस दलाच्या पुढाकाराने करण्यात आलेल्या या प्रयत्नांमुळे गावातील जनतेत आनंदाचे वातावरण असून एवढ्या मोठ्या प्रमाणावर आपण धान्य पिकवू शकतो यावर त्यांचा विश्वास नव्हता. पोलिस दलाने ग्रामीण जनतेसाठी सुरू केलेल्या या प्रकल्पामुळे आम्हाला मोठ्या प्रमाणावर लाभ होईल, असे मत शेतकऱ्यांनी व्यक्त केले आहे.

   Print


News - Gadchiroli | Posted : 2018-12-20


Related Photos