महत्वाच्या बातम्या

 आजचे दिनविशेष  


२५ मार्च महत्वाच्या घटना

१६५५ : क्रिस्टियन हायगेन्स यांनी शनिच्या टायटन या सर्वात मोठया उपग्रहाचा शोध लावला.

१८०७ : गुलाम व्यापार कायदा करून ब्रिटिश साम्राज्य मध्ये गुलामांचा व्यापार बंद करण्यात आला.

१८९८ : शिवरामपंत परांजपे यांचे काळ हे साप्ताहिक सुरू झाले.

१९२९ : लाहोर काँग्रेसचे ऐतिहासिक अधिवेशन सुरू झाले.

१९९७ : जगदीश शरण वर्मा यांनी भारताचे २७ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.

२००० : १७ वर्षीय जलतरणपटू रुपाली रेपाळे हिने दक्षिण आफ्रिकेतील रॉबेन आयलंड खाडी पोहून पार केली. ही खाडी पोहणारी ती वयाने सर्वात लहान जलतरणपटू आहे.

२०१३ : मणिपूर उच्च न्यायालयाची स्थापना

२०१३ : मेघालय उच्च न्यायालयाची स्थापना.

२५ मार्च जन्म

१९३२ : लेखक व कथाकथनकार वसंत पुरुषोत्तम ऊर्फ व. पु. काळे यांचा जन्म. (मृत्यू : २६ जून २००१)

१९३३ : शास्त्रज्ञ वसंत गोवारीकर यांचा जन्म. 

१९३७ : डॉमिनोज पिझ्झा चे निर्माते टॉम मोनाघन यांचा जन्म.

१९४७ : इंग्लिश संगीतकार व गायक सर एल्टन जॉन यांचा जन्म.

१९५६ : ग्वाल्हेर घराण्याचे गायक मुकूल शिवपुत्र यांचा जन्म.

२५ मार्च मृत्यू

१९३१ : भारतीय पत्रकार आणि राजकारणी गणेश शंकर विद्यार्थी यांचे निधन. (जन्म : २६ ऑक्टोबर १८९०)

१९४० : आसामी कादंबरीकार उपन्यास सम्राट रजनीकांत बर्दोलोई यांचे निधन. (जन्म : ११ डिसेंबर १८६७)

१९७५ : सौदी अरेबियाचा राजा फैसल यांचे निधन.

१९९१ : जयपूर-अत्रौली घराण्याचे गायक वामनराव सडोलीकर यांचे निधन. (जन्म : १६ सप्टेंबर १९०७)

१९९३ : साहित्यिक मधुकर केचे यांचे निधन. (जन्म : १७ जानेवारी १९३२)





  Print






News - todayspecialdays




Related Photos