शनिवारी दिव्यांग बांधवाना सहायक उपकरणांचे वाटप
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / भंडारा : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षा निमित्त केंद्रीय सामाजिक न्याय विभागातर्फे दिव्यांग बंधु-भगिनींना एडीप योजनेअंतर्गत दिव्यांग सुलभ सहायक उपकरणांचे वाटप येत्या शनिवारी सकाळी 10 वाजता पोलीस सभागृहात आयोजित करण्यात आले आहे.
या कार्यक्रमाला केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री डॉ. वीरेंद्र कुमार यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. खासदार सुनील मेंढे यांच्या पुढाकाराने यापूर्वीही जिल्ह्यात दिव्यांग सुलभ साहित्याचे वाटप करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला जिल्हा परिषदेचे अध्यक्ष गंगाधर जिभकाटे, खासदार प्रफुल पटेल यांच्यासह आमदार सर्वश्री अभिजीत वंजारी, सुधाकर अडबाले, नरेंद्र भोंडेकर, नाना पटोले, राजू कारेमोरे उपस्थित राहणार आहेत.
News - Bhandara