महत्वाच्या बातम्या

 आत्माच्यावतीने जिल्हास्तरीय धान्य व मिलेट महोत्सव


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / वर्धा : कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) अंतर्गत शेतकरी ते ग्राहक थेट विक्री संकल्पनेवर आधारित जिल्हास्तरीय धान्य व मिलेट महोत्सवाचे आयोजन 23 ते 25 मार्च या कालावधीत करण्यात आले आहे. वर्धा रेल्वे स्टेशन समोरील द रुरल मॉल येथे आयोजित या महोत्सवास नागरिकांनी भेट देऊन धान्य व घरगुती पदार्थ खरेदी करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

शेतकऱ्यानी उत्पादीत केलेला माल थेट ग्राहकांना खरेदीसाठी उपलब्ध व्हावा यासाठी  धान्य व मिलेट महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवात एकुण 30 स्टॉल उभारण्यात येणार आहे. यामध्ये खास आंतरराष्ट्रीय पौष्टीक तृणधान्य वर्षानिमित्त्याने मिलेट अर्थात ज्वारी, बाजरी, नाचणी, भगर, राजगीरा, राळा, कुटकी, कोंदो इत्यादीचे महत्वाबाबत नागरिकांमध्ये जनजागृती होण्याच्यादृष्टीने विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे.

धान्य महोत्सवात नव्याने उत्पादीत बन्सी, लोकवन, शरबती, सोनामोती जातीचे गहू, तुरदाळ, हरभरा दाळ, चणोली, मुंगदाळ, काळा मुंग, लाखोळी दाळ, नवीन आलेला तांदूळ, हळद, भिवापूरी मिरची, लाल मिरची, जांभुळघाटी मिरची, धने, मोहरी, सेंद्रीय गुळ, महिला बचत गटांकडून तयार करण्यात आलेल्या शेवळ्या, कुरवडी, पापड, सरगुंडे, बिटचे पापड, ज्वारीचे पापड, अंबाडीचे पदार्थ, लोणचे व विविध सौदर्य उपयोगी संसाधने, ताजा भाजीपाला, गडचिरोली जिल्ह्यातील कलेक्टर आंबा, वर्ध्यातील स्ट्रॉबेरी, फळे व घरगुती खाद्य पदार्थ उपलब्ध असणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मदतीचा हात देऊन आर्थिक स्थैर्य अबाधीत राखण्यास मदत करावी, असे आत्माच्यावतीने कळविण्यात आले आहे.





  Print






News - Wardha




Related Photos