महत्वाच्या बातम्या

 पोलिस मदत केंद्र गट्टा ( जांबिया) येथे महिला मेळावा संपन्न 


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / अहेरी : 13 मार्च 2023 रोजी पोलीस मदत केंद्र गट्टा (जांबिया) येथे पोलीस अधीक्षक, नीलोत्पल, अप्पर पोलीस अधीक्षक अनुज तारे, अप्पर पोलीस अधीक्षक कुमार चिंता, अप्पर पोलीस अधीक्षक यतीन देशमुख यांच्या संकल्पनेतून तसेच उप विभागीय पोलीस अधिकारी बापुराव दडस उपविभाग हेडरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस मदत केंद्र गट्टा जांबिया येथे महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.

सदर महिला मेळाव्यामध्ये कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून गटटा ग्रामपंचयतच्या सरपंच पुनम जेट्टी, ग्रामपंचायत सदस्य संनु गोटा, महिला बचत गटाचे अध्यक्ष सुनीता महाजन, अश्विनी गोटा व इतर मान्यवर सदस्य यांची उपस्थिती लाभली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक महिला पोलिस आंमलदार पायल खोब्रागडे यांनी केले. तसेच महिला नाईक आंमलदार मीनाक्षी पोरेड्डीवार यांनी महिलांचे कायदे विषयक माहिती सांगितली. पोलीस उपनिरीक्षक वैभव तिडके यांनी आदिवासी भागातील महीलांचे सक्षमीकरणसाठी गडचिरोली पोलिस करत असलेल्या कामांबाबत महत्त्व पटवून दिले.

प्रभारी अधिकारी चेतन परदेशी यांनी पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातून महिलांसाठीच्या विविध शासकीय योजनांची माहिती देऊन त्याचा लाभ घेण्यासाठी आवाहन केले. तसेच उपस्थितांना पोलीस दादालोरा खिडकी हि पुर्ण शासकीय योजना उपलब्ध करून देणारी खिडकी असल्याचे समजावून सांगितले व या खिडकी अंतर्गत देण्यात येणा-या योजना चा लाभ घ्यावा असे आवाहन केले. तसेच गडचिरोली पोलीस दल मार्फत महिलांसाठी, बचत गटांसाठी घेण्यात येणाऱ्या विविध प्रशिक्षण व योजनांची माहिती देऊन जास्तीत जास्त महिलांना सहभागी होण्यासाठी सांगितले.

सदर महिला मेळाव्यामध्ये उपस्थित महिलांना साड्या वाटप करण्यात आल्या. तसेच महिलांसाठी संगीत खुर्ची व मटका फोड सारख्या खेळांचे आयोजन करून विजेता महिलांना रोख रक्कम बक्षीस म्हणून देण्यात आले. सदर महिला मेळाव्याला 80 ते 90 महिला नागरिक उपस्थित होते. उपस्थित महिलांना चहा, नाश्ताची व्यवस्था करण्यात आली होती. सदर महिला मेळावा यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी पोउपनि/ चेतन परदेशी, पो. उपनि वैभव तिडके, तसेच जिल्हा पोलिसचे महिला व पुरुष अमलदारांनी विशेष परिश्रम घेतले. सदरचा मेळवा शांततेत पार पडला.





  Print






News - Gadchiroli




Related Photos