महत्वाच्या बातम्या

 श्रीष्टी येथील पुलाचे काम येत्या तीन महिन्यात पूर्ण करणार : मंत्री शंभुराज देसाई


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

वृत्तसंस्था / मुंबई : जालना जिल्ह्यातील शेगाव ते पंढरपूर पालखी मार्गावरील श्रीष्टी येथील पुलाचे काम येत्या आठ दिवसात सुरुवात करुन तीन महिन्यात पूर्ण करण्यात येईल. पुलाचे काम पूर्ण झाल्यावर हा पूल वापरासाठी उपलब्ध करण्यात येईल असे मंत्री शंभुराज देसाई यांनी विधानसभेत सांगितले. याबाबत विधानसभा सदस्य बबनराव लोणीकर यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती.

मंत्री देसाई म्हणाले, श्रीष्टी पुलाच्या कामात दिरंगाई झाली असल्यास ती कशामुळे झाली याची एका महिन्याच्या आत चौकशी करण्यात येईल. याबाबत कोणी दोषीं आढळल्यास संबधितांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे देसाई यांनी सांगितले.

सावंगीगंगा किनारा येथील भूसंपादनाचा निवाडा मंजुरीकरिता केंद्रीय सडक परिवहन मंत्रालय यांच्याकडे पाठवण्यात आलेला आहे. परतुर ते माजलगाव पॅकेज मध्ये अंदाजपत्रकात भूसंपादनासाठी अंदाजे ३.७५ कोटी रुपये इतकी रक्कम गृहीत धरण्यात आली होती. मात्र यात प्रत्यक्षात वाढ होऊन ६.३४ कोटी रुपये  इतकी लागत असल्याने सदर भूसंपादन निवाडे मंजुरी करता केंद्रीय सडक परिवहन मंत्रालय दिल्ली यांच्याकडे पाठवण्यात आले असून याबाबत पाठपुरावा करण्यात येणार असल्याचे मंत्री देसाई यांनी सांगितले.

या चर्चेत विधानसभा सदस्य हरी बागडे यांनी सहभाग घेतले.





  Print






News - Rajy




Related Photos