महत्वाच्या बातम्या

 बारावीच्या सर्व विद्यार्थ्यांना इंग्रजी विषयातील चुकिच्या प्रश्नांचे ६ गुण सरसकट देण्यात यावे : सारंग जांभुळे


- शालेय शिक्षण मंत्र्यांना तहिसलदार मार्फत निवेदन.

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

तालुका प्रतिनीधी/आरमोरी : इयत्ता बारावीच्या ज्या विद्यार्थ्यांनी चुकीचे प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न केला फक्त त्या विध्यार्थ्यांना ६ गुण न देता इयत्ता बारावीच्या सर्व विद्यार्थ्यांना इंग्रजी विषयाचे त्या चुकिच्या प्रश्नांचे ६ गुण सरसकट देण्याबाबत सारंग जांभुळे यांच्या नेतृत्वात शालेय शिक्षण मंत्र्यांना तहिसलदार मार्फत निवेदन देण्यात आले.

निवेदनात म्हटले कि, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे सध्या इयत्ता दहावी व बारावीची परीक्षा घेण्यात येत आहे. मात्र इयत्ता बारावीच्या पहिल्या परीक्षेमध्ये प्रश्नपत्रिकेत चुका होत्या. बारावीच्या पहिल्याच इंग्रजी पेपर मध्ये शिक्षण मंडळाकडून झालेल्या चुकांच्या पार्श्वभूमीवर विषयतज्ञ व सर्व विभागीय मंडळाचे प्रमुख नियमकांच्या उपस्तिथीत इंग्रजी विषयांची संयुक्त सभा घेतले. या सभेतील अहवालानुसार ज्या विद्यार्थ्यांनी चुकीचे प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न केला, त्यांना ६ गुण देण्यात येतील, असे परीक्षा मंडळाने जाहीर केले. बारावीच्या विद्यार्थ्यांच्या महत्वाच्या परीक्षे मध्ये मंडळाकडून या चुका केले आणि याचा भुर्दंड मात्र विद्यार्थ्यांवर बसत आहे .

सर्व विद्यार्थ्यांर्थी व त्यांच्या पालकांमध्ये महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळा कडून विद्याथ्यार्थी जीवनातील सगळ्यात महत्तवाची परिक्षा मानल्या जाणाऱ्या बारावीच्या परिक्षेत इंग्रजी पेपर मध्ये मंडळाकडून प्रश्नाच्या चुकांमुळे संभ्रमन व रोष निर्मान झाले आहे. 

तरी आपण या विषयावर उचित ती कारवाही करून इयत्ता बारावीच्या ज्या विद्यार्थ्यांनी चुकीचे प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न केला फक्त त्याच विध्यार्थ्यांना ६ गुण न देता इयत्ता बारावीच्या सर्व विध्यार्थ्यांना इंग्रजी विषयाचे त्या चुकिच्या प्रश्नांचे ६ गुण सरसकट देण्यात यावे .

यावेळी अंकुश गाडवे, साबीर शेख, मनोज सावकार टेंभूर्णे, उत्कर्ष ठाकरे, अभिषेक उंदीरवाडे, समर्पक जांभुळे, निकेतन सोरते, अमित हुमाने उपस्थित होते.





  Print






News - Chandrapur




Related Photos