महत्वाच्या बातम्या

 भामरागड येथे पाणपोईची सुरुवात : सांजमाडी या संस्थेचा नियमीत उपक्रम


- रनरनच्या उन्हात होतेय तृष्णातृप्ती 

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / भामरागड : सांज मल्टी अँक्टीव्हीटी डेव्हलपमेन्ट इन्स्टीटयुट मस्टर एरीया बिनागुंडा स्थीत भामरागड या सामाजीक स्वयमसेवी संस्थेद्वारा भामरागड, लाहेरी या मुख्य रस्त्यावर पानपोई सुरू करून सामाजीक बांधीलकी जोपासली. नगर पंचायत भामरागडची अध्यक्षा रामबाई कोमटी महाका यांच्या हस्ते पाणपोईचे उद्‌घाटन करण्यात आले. यावेळी भागमरागडचे प्रतिष्टीत नागरीक राकेश महाका, मंगल सरदार, तपेश हलदार, कांडू खोंडे, अनमोल चवरे, जनादीश दुर्गे, व्यापारी संघटनेचे सदस्य सुभाष बाला उपस्थीत होते.

दिवसें दिवस वाढत्या तापमानामुळे घशाला लवकर कोरड पडते, परंतु सर्वसामान्य नागरीकाना पिण्याचे पानी सहज उपलब्ध होत नाही. पिण्याचे पानी मिळत नसल्यामुळे अतीदुर्गम भागातून येणाऱ्या नागरीकांना पाण्यासाठी त्यांची वनवन होते. तहानलेल्या व्यक्तीना पानी विकत घेऊन प्यावे लागते. नागरीकांची पाण्याची गरज लक्षात घेत संस्थेनी दरवर्षी प्रमाने यंदा देखील ( वर्षे 8 वे) पाणपोईचा सेवाभावी उपक्रम सुरु केला आहे.

पादचाऱ्यासह कामगार, कष्टकरी फेरीवाले, प्रवासी विद्यार्थी, इतर प्रवासी या साऱ्यानाच तहान भागवण्यासाटी पानपोईचा आधार मिळत आहे. पानपोईत जारचे शुद्ध व थंडगार पाण्याची व्यवस्था आयोजका कडून केलेली आहे. तहानलेले नागरीक शुद्ध थंडगार पानी पिऊन समाधान व्यक्त करित पानपोईचे आयोजक तथा संस्थेचे संस्थापक कुमार रूपलाल मारोती गोंगले यांना धन्यवाद देत आहेत.





  Print






News - Gadchiroli




Related Photos