महत्वाच्या बातम्या

 ओला दुष्काळ जाहिर करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे भरपावसात आंदोलन


विदर्भ न्युज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था /  बुलढाणा : या वर्षी पावसान बुलढाणा जिल्ह्यासह महाराष्ट्रात थैमान घातलेले आहे. या पावसामुळे शेतकऱ्यांच्या सोयाबीन, कपाशीसह सर्व पिकांचे प्रचंड नुकसान झाले. सोयाबीन, कपाशीला कोंब फुटलेले असतांना शेतकरी प्रचंड नैराष्यात आहे. समोर दिवाळी सारखा सण असतांना शेतकरी आसमानी संकटात सापडला असल्यामुळे दिवाळी अंधारात जाण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. या दुष्काळी परिस्थितीतून शेतकऱ्यांना बाहेर काढण्यासाठी आज आर्थिक संकटात असतांना सरकार मात्र दुर्लक्ष करतांना दिसत आहे. शिंदे-फडणवीस सरकारला शेतकऱ्यांच्या परिस्थितीची जानिव असल्याचे कुठेच दिसून येत नाही. यामुळेच सरकारच लक्ष्य शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे वळविण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जळगाव जामोद तालुका व शहराच्या वतीने जळगाव जामोद व संग्रामपुर तालुक्यात ओला दुष्काळ जाहिर करा. शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार अनुदान जाहिर करा. कोणत्याही अटीविना पिकवीमा मंजूर करा. या मागण्यांसाठी ठेचा भाकर खावून एकदिवशीय धरने आंदोलन करण्यात आले. धरने आंदोलन चालू असतांनाच मूसळधार पाऊस चालू झाला असता भर पावसात प्रचंड घोषणाबाजीत ओल्या दुष्काळाची मागणी करण्यात आली. निवेदन देतांना उपविभागीय अधिकारी कार्यालयात कोनताच अधिकारी हजर नसल्याने खुर्चीला निवेदन देण्यात आले. यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस प्रसेनजीत पाटिल यांनी अधिकार्यांचा खरपुस समाचार घेतला. या आंदोलनात प्रसेनजीत पाटिल, रंगराव देशमुख, प्रकाश ढोकने, प्रमोद सपकाळ, महादेव भालतड़क, अजहर देशमुख, एम. डी. साबीर, पराग अवचार, शेख जावेद, वर्षा वाघ, सविता वाघ, आशिष वायझोडे, दत्ता डिवरे, अनूप महाले, ईरफान खान, दादाराव धंदर,प्रकाश गावंडे, अशोक गवळी, श्रीकृष्ण जाधव, तुकाराम वाघ, चांद शाह, योगेश बोराखडे, एजाज देशमुख, गोपाल भालतड़क, सुभाष कोकाटे, महादेव वानखड़े, सिद्धार्थ हेलोडे, शेख ताहेर, डॉ. प्रल्हाद कपले, संजय ढगे, संजय दंडे, संजय देशमुख, संतोष देशमुख, विष्णु रोठे, संभाजी ठाकुर, शकील पिंजारी, जैकी खान, राजू पा. अवचार, मोहाजिर मौलाना, आकाश जाने, सदाशिव जाणे, योगेश घोपे, फिरोज भाई, सिद्धार्थ इंगळे, सलमान खान, गोपाल गवळी, अमान खान यांच्यासह शेकडो कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.





  Print






News - Rajy




Related Photos