महत्वाच्या बातम्या

 गडचिरोली : नक्षल्यांनी उच्चशिक्षित तरुणाची केली हत्या


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली : पोलिसांचा खबऱ्या असल्याच्या संशयावरून नक्षलवाद्यांनी स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या एका उच्चशिक्षित तरुणाची हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. सदर घटनेची माहिती मिळताच पोलिसांचे पथक घटनास्थळी रवाना झाले आहे.

माहितीनुसार, साईनाथ नरोटे (२६) असे तरुणाचे नाव असून तो भामरागड तालुक्यातील मर्दहुर गावाचा रहिवासी होता. साईनाथ हा गडचिरोली येथे शिक्षणासोबतच स्पर्धा परीक्षेची तयारी करीत होता. होळीच्या सणानिमित्याने आपल्या स्व:गावी आला होता. मात्र, साईनाथ हा पोलिसांचा खबऱ्या असल्याच्या संशयावरून नक्षलवाद्यांनी त्याची हत्या केले.

त्यामुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.





  Print






News - Gadchiroli




Related Photos