महत्वाच्या बातम्या

 भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना : ५ मार्चला त्रृटी पूर्तता शिबिराचे आयोजन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / नागपूर : विद्यार्थ्यांना भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना लागू करण्यात आली असून शासन निर्णयानुसार अनुसूचित जाती व नवबौध्द विद्यार्थ्यांना मागासवर्गीय शासकीय वसतिगृहातील मुला-मुलींप्रमाणे भोजन, निवास, शैक्षणिक साहित्य, निर्वाह भत्ता व इतर आवश्यक सुविधा स्वत: उपलब्ध करुन घेण्यासाठी रक्कम त्यांच्या आधार संलग्न बँक खात्यावर थेट जमा करण्यात येते. नागपूर जिल्हयातील सत्र 2021-22 मध्ये स्वाधार योजनेचा लाभ मिळण्यासाठी अर्ज केलेल्या सर्व अर्जांची तपासणी व छाननी करण्यात आली असून काही विद्यार्थ्यांच्या अर्जात तृटया आढळुन आलेल्या होत्या, अशा विद्यार्थ्यांना या कार्यालयामार्फत अनेकदा भ्रमणध्वनीद्वारे संपर्क करुनही अद्यापही त्रृटी पूर्तता केलेली नाही. अशा विद्यार्थ्यांकरीता रविवार, 5 मार्चला सकाळी 11 ते दुपारी 2 वाजेपर्यंत एक दिवासीय त्रुटी पुर्तता शिबिर आयोजित केले आहे.

ज्या विद्यार्थ्यांनी त्रुटी पूर्तता केलेली नाही, अशा विद्यार्थ्याकरीता त्रृटी पुर्तता करण्याकरीता अंतीम संधी देण्यात येत आहे, असे जाहिर आवाहन सुकेशिनी तेलगोटे, सहाय्यक आयुक्त समाज कल्याण, नागपूर यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय, नागपूर येथे संपर्क साधावा.               





  Print






News -




Related Photos